जालना: गुढीपाडवा हा नवीन वर्षातील पहिला सण अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. पाडव्याला अंगणात गुढी उभा करण्याची परंपरा आहे. याबाबत काही आख्यायिका देखील सांगितल्या जातात. गुढी उभा करण्याला विशेष धार्मिक महत्त्व देखील आहे. याबाबतच जाला येथील ज्योतिष अभ्यासक डॉ. राजेश महाराज सामानगावकर यांनी माहिती दिलीये.
हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते. नवीन वर्षाचे चैतन्य देणारे हिंदू नवपर्व म्हणजे गुढीपाडवा होय. त्यामुळे पाडव्याला गुढी ही आपल्या दारासमोर उंच अशी उभारावी. गुढीला रेशमी वस्त्र, साखरेची गाठी, उंच असा बांबू, कडूलिंबाची पाने, फुलांचा हार आदी साहित्य आवश्यक आहे. उंच गुढी उभारल्यानंतर ब्रह्म ध्वज म्हणून त्याची पूजा करावी. गुढी ही सूर्योदयानंतरच उभारावी, असे डॉ. सामानगावकर सांगतात.
advertisement
गुढी उभारल्यानंतर दिवसभरात घरामध्ये नैवेद्य तयार केला जातो. तो नैवेद्य गुढीला अर्पण करावा. सायंकाळच्या वेळी कुंकू वाहून दिवाबत्ती अगरबत्ती लावून गुढी उतरावे.
Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याला नवीन वाहन किंवा सोने खरेदी करताय? शुभ मुहूर्त कोणता? Video
प्रभू राम अयोध्येत परतले
प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपून जेव्हा अयोध्येला परतले तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा होय. भगवान विष्णूने मत्स्य रुप याच दिवशी धारण केले. शालिवाहन नावाच्या राजाने मातीचे पुतळे तयार करून त्यामध्ये जीव ओतला व या सैन्याच्या सहाय्याने तो युद्ध जिंकला. तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. यामुळेच हिंदू धर्मामध्ये चैत्रशुद्ध प्रतिपदेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये नवी देशा देणारे आनंद उत्साह आणि नवचैतन्य घेऊन येणार असं हे नववर्ष आहे. या नववर्षाचे स्वागत प्रत्येकाने गुढी उभारून आनंदाने आणि उत्साहाने करावं, असं आवाहन डॉक्टर राजेश महाराज सामनगावकर यांनी केले.





