Happy New Year: नवीन सालाची सुरुवात मंगलमय! वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीसहित या 5 ठिकाणी दिवा लावणं शुभ

Last Updated:

Happy New Year Astrology: 2026 सालाचा पहिला दिवस गुरुवार आहे, अर्थातच गुरुवार विष्णू आणि देवांचे गुरु बृहस्पती यांना समर्पित आहे. वास्तू शास्त्रानुसार, 2026 च्या पहिल्या दिवशी तुळशीसह 5 ठिकाणी दिवा लावल्याने धनलक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल. तसेच वास्तू दोष, पितृ दोष यांसारख्या...

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात दिवा लावण्याला वैदिक, ज्योतिषीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत सखोल महत्त्व आहे. दिवा केवळ अंधकार दूर करत नाही तर तो आयुष्यात येणाऱ्या प्रकाशाचेही संकेत देतो. शास्त्रांमध्ये दिवा हा ज्ञान, चैतन्य आणि ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रतीक मानला गेला आहे. अशा परिस्थितीत 2026 सालाच्या पहिल्या दिवशी तुळशीसह 5 ठिकाणी दिवा लावण्याला विशेष महत्त्व आहे.
2026 सालाचा पहिला दिवस गुरुवार आहे, अर्थातच गुरुवार विष्णू आणि देवांचे गुरु बृहस्पती यांना समर्पित आहे. वास्तू शास्त्रानुसार, 2026 च्या पहिल्या दिवशी तुळशीसह 5 ठिकाणी दिवा लावल्याने धनलक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल. तसेच वास्तू दोष, पितृ दोष यांसारख्या अनेक दोषांपासून मुक्ती मिळेल. जाणून घेऊया की 2026 च्या पहिल्या दिवशी कोणत्या ठिकाणी दिवा लावला पाहिजे.
advertisement
ईशान्य आणि पूर्व दिशा - वास्तुशास्त्रानुसार, 2026 च्या पहिल्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला दिवा नक्की लावावा. या दिशेचे स्वामी स्वतः देवाधिदेव महादेव आहेत, ही दिशा सुख-समृद्धी, ज्ञान आणि सकारात्मकतेची मानली जाते. या दिशेला दिवा लावल्यानं सर्व दोष दूर होतात आणि घरात सुख-शांती आणि समृद्धी येते. ईशान्य कोपऱ्यासोबतच पूर्व दिशेलाही दिवा नक्की लावावा. या दिशेला दिवा लावल्यानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाग्याची साथ मिळते आणि या दिशेचे स्वामी देवगुरु बृहस्पती आहेत.
advertisement
तुळशीपाशी दीपदान - वास्तूनुसार, 2026 च्या पहिल्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपापाशी दिवा नक्की लावावा. जर घरात तुळशी नसेल तर जवळच्या मंदिरात जिथे तुळशीचे रोप असेल तिथे दिवा लावून यावा. तुळशीपाशी दिवा लावल्याने सर्व सुखांची प्राप्ती होते आणि वास्तू दोषही दूर होतो.
दारात - वास्तूनुसार, वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी दारात कणकेचा चार मुखी दिवा नक्की लावावा. घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि माता लक्ष्मीचेही घरात आगमन होते. त्यामुळे 2026 च्या पहिल्या दिवशी मुख्य दरवाजाशी दिवा लावायला विसरू नका.
advertisement
घरातील देवघर - 2026 च्या पहिल्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी घरातील देव्हाऱ्याची साफसफाई करून, गंगाजल शिंपडून शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावावा. असे केल्याने वर्षाच्या पहिल्या दिवशी देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि पितरही प्रसन्न होतात. देव्हाऱ्यात दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात.
शिवमंदिरात - 1 जानेवारीला घरातील देव्हाऱ्यासोबतच जवळच्या शिवालयात जाऊन सकाळी आणि संध्याकाळी दिवा नक्की लावून यावा. असे केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि कुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती मजबूत होते. तसेच आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ती येणाऱ्या सर्व संकटांना दूर ठेवते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Happy New Year: नवीन सालाची सुरुवात मंगलमय! वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीसहित या 5 ठिकाणी दिवा लावणं शुभ
Next Article
advertisement
BMC Election : मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
  • आता अनेक प्रभागांतील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • मात्र, मतदानापूर्वीच महायुतीला दोन जागांवर मोठा धक्का बसला आहे.

  • दोन जागांवर महायुतीचे उमेदवार नाहीच.

View All
advertisement