Sarfaraz Khan Century : नाद करतो काय! सरफराजची 157 धावांची ऐतिहासिक खेळी, श्रेयसच्या जागेवर टीम इंडियात संधी मिळणार?

Last Updated:
Sarfaraz Khan Century : सरफराजने अवघ्या 23 बॉलमध्ये आपली फिफ्टी पूर्ण केली, तर त्याचा भाऊ मुशीर खानने 66 बॉलमध्ये 60 धावांचे योगदान दिले. सरफराजने आपल्या 101 धावा पूर्ण करण्यासाठी 7 फोर आणि 7 सिक्स लगावले होते.
1/7
मुंबईच्या सरफराज खानने विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये गोवा विरुद्ध खेळताना सलेक्टर्सचे दरवाजे पुन्हा एकदा ठोठावले आहेत. या मॅचमध्ये त्याने अवघ्या 56 बॉलमध्ये झंझावाती शतक झळकावलं.

advertisement
2/7
सरफराज खानने 75 बॉलमध्ये 157 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. या सीझनमध्ये सरफराजची ही दुसरी मोठी खेळी असून, त्याने यापूर्वी एका मॅचमध्ये 55 धावांची वेगवान इनिंग खेळली होती.

3/7
महत्त्वाचे म्हणजे, मागील मॅचमध्ये रोहित शर्माच्या 155 धावांच्या खेळीमुळे त्याला केवळ 8 धावांवर नाबाद राहावे लागले होते. मात्र, सरफराजने आजच्या सामन्यात कोणतीही कसर सोडली नाही.

4/7
गोवा विरुद्धच्या या मॅचमध्ये मुंबईची सुरुवात काहीशी संथ झाली होती. यशस्वी जयस्वालने 64 बॉलमध्ये 46 धावा केल्या, तर अंगकृष रघुवंशी केवळ 11 धावांवर बाद झाला. मात्र, खान बंधूंच्या जोडीने गोव्याच्या बॉलर्सची पळताभुई थोडी केली.

5/7
सरफराजने अवघ्या 23 बॉलमध्ये आपली फिफ्टी पूर्ण केली, तर त्याचा भाऊ मुशीर खानने 66 बॉलमध्ये 60 धावांचे योगदान दिले. सरफराजने आपल्या 101 धावा पूर्ण करण्यासाठी 7 फोर आणि 7 सिक्स लगावले होते.

6/7
सरफराज खान सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये असून गेल्या 11 टी20 आणि लिस्ट-ए सामन्यांमधील 10 डावांत त्याने 2 शतके आणि 4 फिफ्टी झळकावल्या आहेत. यामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील एका शतकाचा आणि 3 फिफ्टीचा समावेश आहे.

7/7
दरम्यान, सरफराज खानने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 3 डावात 1 फिफ्टी आणि 1 शतक झळकावून टीम इंडियात आपली दावेदारी अधिक मजबूत केली आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या जागेवर त्याला सरफराजला संधी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

BMC Election : मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
  • आता अनेक प्रभागांतील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • मात्र, मतदानापूर्वीच महायुतीला दोन जागांवर मोठा धक्का बसला आहे.

  • दोन जागांवर महायुतीचे उमेदवार नाहीच.

View All
advertisement