एकच अपत्य असणे दोष -
आजच्या काळात अनेक दाम्पत्ये कौटुंबिक नियोजन, सामाजिक परिस्थिती किंवा वैयक्तिक निर्णयामुळे एकाच मुलावर समाधान मानत आहेत. आर्थिक स्थितीनुसार प्रत्येकजण आपल्या आयुष्याचे नियोजन करत असतो. ज्योतिषाचार्य गोपाळ शर्मा यांच्या मते, केवळ एकच अपत्य असणे कोणत्याही अर्थाने दोष मानले जात नाही. एक मुलगा किंवा एकच मुलगी असणे हे अधिक दोष निर्माण करते, असे म्हणणे निव्वळ अंधश्रद्धा आहे. त्यामुळे जर तुम्हाला एकच संतान असेल तर घाबरून जाण्याचे किंवा दोष लागेल, असे मानण्याचे काहीही कारण नाही.
advertisement
ज्योतिषशास्त्र काय सांगते?
ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला एक अपत्य झाल्यानंतर दुसरे मूल होण्यात अडचणी येत असतील, तर त्याला कुंडलीतील ग्रहांची स्थिती कारणीभूत असू शकते. कुंडलीतील पाचवे स्थान हे संततीचे स्थान मानले जाते. या स्थानी गुरु, केतू किंवा मंगळ यांसारख्या शत्रू ग्रहांची उपस्थिती किंवा अशुभ ग्रहांची दृष्टी असल्यास संतान प्राप्तीमध्ये अडचणी येऊ शकतात.
जर राहू किंवा केतू पाचव्या भावात असतील, तर त्याला सर्पदोष किंवा पुत्रदोष असेही म्हटले जाते. या दोषामुळे संतान प्राप्तीला उशीर होऊ शकतो किंवा वंध्यत्वासारख्या समस्या जाणवू शकतात. मात्र, अशा ग्रहांच्या स्थितीमुळे एक संतान प्राप्त झाली असेल, तर त्या मुलाला काही हानी होईल किंवा त्यामुळे कुटुंबाला दोष लागेल, असे मानणे पूर्णपणे चुकीचे आहे.
आठवड्याचा लकी अंक! मूलांक 1 ते 9 कोणासाठी भाग्याची स्थिती; साप्ताहिक अंकशास्त्र
ग्रहदोषांवर ज्योतिषशास्त्रीय उपाय -
ज्यांना संतती संबंधित समस्या किंवा ग्रहदोष जाणवत असतील, ते ज्योतिषीय सल्ल्यानुसार काही उपाय करू शकतात: 1. नागदेवतेला दूध किंवा पंचामृताने अभिषेक केल्यास नाग दोषाची तीव्रता कमी होते. 2. काही पवित्र ठिकाणी जाऊन राहू केतू शांती पूजा करणे शुभ मानले जाते. ३. देवी दुर्गा आणि गणरायाची श्रद्धापूर्वक पूजा केल्याने कुंडलीतील अडचणी दूर होतात. 4. नवग्रह मंदिरांमध्ये गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान केल्याने ग्रहांच्या दोषांपासून दिलासा मिळतो. थोडक्यात सांगायचे तर, एकच मूल असणे हा कोणताही अपशकुन नसून तो त्या दाम्पत्याचा निर्णय किंवा ग्रहांच्या स्थितीचा परिणाम असू शकतो.
धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीभविष्य; जानेवारी महिना कोणासाठी लकी?
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
