होलाष्टक 2026: तारीख आणि वेळ
होलाष्टक फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून सुरू होते आणि पौर्णिमेला संपते. यावर्षी होलाष्टकची सुरुवात 24 फेब्रुवारीपासून होत आहे. तर याची समाप्ती 3 मार्च 2026, मंगळवारी होत आहे. या काळात सर्व शुभ कार्यांवर बंदी असते आणि धुलिवंदनानंतर म्हणजेच 4 मार्च 2026 पासून पुन्हा शुभ मुहूर्त सुरू होतात.
advertisement
होलाष्टक काळात 'या' गोष्टी करू नयेत
शास्त्रानुसार, या 8 दिवसांत ग्रहांची स्थिती प्रतिकूल असल्याने काही गोष्टी या काळात टाळाव्यात. होलाष्टक काळात विवाह करणे अत्यंत अशुभ मानले जाते. या काळात झालेल्या विवाहामुळे वैवाहिक सुखात बाधा येते अशी मान्यता आहे. नवीन घरात प्रवेश करणे किंवा नवीन वास्तूचे बांधकाम सुरू करणे या काळात टाळावे. कोणत्याही नवीन उद्योगाची किंवा व्यवसायाची सुरुवात या 8 दिवसांत करू नये. बालकांचे बारसे, मुंज किंवा इतर कोणतेही संस्कार या काळात केले जात नाहीत. नवीन वाहन, दागिने किंवा मालमत्ता खरेदी करणे शक्यतो टाळावे.
होलाष्टक काळात 'हे' आवर्जून करावे
जरी हा काळ शुभ कार्यांसाठी निषिद्ध असला, तरी आध्यात्मिक साधनेसाठी तो अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. होलाष्टक काळात गरिबांना अन्न, वस्त्र आणि धान्य दान केल्याने पुण्यप्राप्ती होते आणि ग्रहांचे दोष दूर होतात. भगवान विष्णू आणि महादेवाच्या मंत्रांचा जप करावा. विशेषतः 'नरसिंह मंत्र' किंवा 'हनुमान चालीसा' वाचणे लाभदायक ठरते. आपल्या कुलदेवतेची पूजा करावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. या काळात होळीसाठी लाकडे गोळा करणे आणि स्वच्छतेची कामे केली जातात.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
