TRENDING:

24 की 25 फेब्रुवारी, होलाष्टक कधीपासून होणार सुरु? होळीच्या 8 दिवसांपूर्वी चुकूनही करू नका 'ही' 7 काम

Last Updated:

हिंदू धर्मात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, मात्र होळीच्या आठ दिवस आधीपासून 'होलाष्टक' सुरू होते. शास्त्रानुसार, होलाष्टक लागल्यानंतर सर्व प्रकारचे शुभ आणि मंगल कार्य वर्ज्य मानले जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Holashtak Date : हिंदू धर्मात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, मात्र होळीच्या आठ दिवस आधीपासून 'होलाष्टक' सुरू होते. शास्त्रानुसार, होलाष्टक लागल्यानंतर सर्व प्रकारचे शुभ आणि मंगल कार्य वर्ज्य मानले जातात. 2026 मध्ये होलाष्टकच्या तारखेबाबत लोकांमध्ये थोडा गोंधळ आहे, तो दूर करून या काळाचे महत्त्व आणि नियम समजून घेणे आवश्यक आहे.
News18
News18
advertisement

2026 मध्ये होलाष्टक कधी सुरू होतो?

होलाष्टक नेहमीच फाल्गुन शुक्ल अष्टमी तिथीला सुरू होतो. होळीच्या अगदी आठ दिवस आधी होलाष्टकला सुरुवात होते. या वर्षी होलिका दहन 2 मार्च रोजी होईल आणि धूलिवंदन म्हणजेच रंगाची होळी 3 मार्च रोजी साजरी केली जाईल. त्यामुळे यावर्षी 24 फेब्रुवारी रोजी होलाष्टक सुरू होत आहे. या आठ दिवसांत घरी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.

advertisement

होलाष्टक दरम्यान शुभ कार्य का वर्ज्य असतात?

यामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, होलाष्टकच्या 8 दिवसांत सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी आणि राहू हे आठही ग्रह क्रमाने अतिशय 'उग्र' स्वरूपात असतात. ग्रहांची ही स्थिती शुभ कार्यासाठी पोषक नसते; अशा काळात केलेले कार्य शुभ फळ देत नाही, अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार, हिरण्यकश्यपूने होळीपूर्वीच्या या 8 दिवसांत भक्त प्रल्हादाला विष्णू भक्ती सोडण्यासाठी असह्य यातना दिल्या होत्या. हा काळ दुःख आणि कष्टाचा मानला जातो, म्हणून यात आनंदाची शुभ कार्ये केली जात नाहीत.

advertisement

होलाष्टकात 'ही' 7 कामे चुकूनही करू नका

विवाह संस्कार: या 8 दिवसांत लग्न किंवा साखरपुडा करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. असे मानले जाते की या काळात लावलेले लग्न टिकण्यात अडचणी येतात.

गृहप्रवेश: नवीन घरात प्रवेश करणे किंवा नवीन वास्तूची शांती करणे टाळावे.

भूमीपूजन आणि बांधकाम: नवीन घराचे बांधकाम सुरू करणे किंवा नवीन मालमत्तेचा करार करणे या काळात टाळावे.

advertisement

मुंज आणि नामकरण: मुलांचे जावळ काढणे, मुंज किंवा नामकरण संस्कार या दिवसांत केले जात नाहीत.

नवीन व्यवसाय: कोणत्याही नवीन उद्योगाची किंवा व्यापाराची सुरुवात या काळात करू नये, अन्यथा तोट्याची शक्यता असते.

मोठी खरेदी: विशेषतः नवीन वाहन किंवा सोन्या-चांदीचे मोठे दागिने खरेदी करणे या काळात शुभ मानले जात नाही.

यज्ञ आणि विशेष विधी: कोणतेही काम्य यज्ञ या काळात करू नयेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रासायनिक काजळामुळे डोळ्यांना धोका? वेळीच घ्या अशी काळजी, सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
24 की 25 फेब्रुवारी, होलाष्टक कधीपासून होणार सुरु? होळीच्या 8 दिवसांपूर्वी चुकूनही करू नका 'ही' 7 काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल