नर्मदापुरम : जर तुमचे मन अशांत असेल आणि निर्णय घेण्यास तुम्ही असमर्थ असाल, तसेच कोणत्याही कार्यात तुम्हाला यश मिळत नसेल तर तुमच्या कुंडलीत चंद्र ग्रह कमजोर आहे, असे समजावे. ज्योतिषाचार्य पंडित पंकज पाठक यांनी याबाबत माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, तुम्हालाही प्रत्येक कामात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कुंडलीतील चंद्र बलवान करावा लागेल. यासाठी तुम्हाला सोमवारी चंद्रदेवाची पूजा करावी लागेल. हा दिवस महादेवाला समर्पित आहे.
advertisement
त्यामुळे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचीही विधीनुसार पूजा केली जाते. मनोकामना पूर्ण करण्यासाठी लोक उपवास करतात. यासोबतच या दिवशी चंद्र देवाची पूजा केली जाते. शास्त्रानुसार, सोमवारी चंद्र देवाची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्र बलवान होतो. तर मग, सोमवारी कोणते उपाय केल्यास कुंडलीतील चंद्र बलवान होतो, हे जाणून घेऊयात.
photos : महिला सरपंचाची कमाल, गावात सुरू केल्या अशा सुविधा की गावकरीही म्हणताय, वाह!
चंद्र बलवान होण्यासाठी हा उपाय करा -
1. कुंडलीतील चंद्र बलवान व्हावा, असे वाटत असेल तर सोमवारी महादेवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करावा. असे केल्याने तुमच्यावर भगवान शिव प्रसन्न होतील. तसेच कुंडलीत चंद्र बलवान असेल. यामुळे तुमचे बिघडलेले काम सुधारेल.
2. ज्योतिषाचार्य यांच्यानुसार, आईला चंद्राचे प्रतीक मानले जाते. जर तुमच्या कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर त्याचा तुमच्या आईच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून, चंद्र बलवान करण्यासाठी, आपण घरी आईची सेवा करावी, आईचा सन्मान करावा. तसेच आईच्या आदेशाचे पालन करावे.
3. सोमवारी कच्चे तांदूळ आणि दूध दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने कुंडलीत चंद्र बलवान होतो. त्यामुळे या दिवशी भक्तीभावाने तांदूळ आणि दूध दान करावे, असे ते म्हणाले.
शिक्षण MA, भारत-पाकिस्तान सीमेवर सुरू केला हा व्यवसाय, आज वर्षाला 1 कोटीपेक्षा जास्त उलाढाल
4. कुंडलीतील चंद्र कमजोर असल्याने मानसिक तणाव निर्माण होतो. यासाठी घरातील कोणत्याही नळातून पाणी टपकणार नाही, हे पाहावे लागेल. तसेच घरातील पाण्याचा अपव्यय थांबवावा लागतो. पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करावा लागेल. विनाकारण पाण्याचा अपव्यय केल्याने कुंडलीतील चंद्र कमजोर होतो आणि तुमचे काम बिघडते. यासोबतच वास्तुनुसार मोराची पिसे घरात ठेवल्याने कुंडलीतील चंद्र बलवान होतो. याशिवाय वास्तुदोषही दूर होतात. त्यामुळे घरातील पूजा घरात मोराची पिसे जरूर लावा.
या मंत्राचा जप करावा -
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचा बीज मंत्र ‘ॐ श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः’ याचा नियमित नामजप केल्याने कुंडलीत चंद्र बलवान होतो. त्यामुळे पांढरे वस्त्र परिधान करून बीज मंत्राचा जप करावा, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.