आग्रा, 7 ऑगस्ट : आग्रा शहराला भगवान शिवशंकराची नगरीही म्हटले जाते. आग्राच्या चारही कोनांवर भगवान महादेवाचे प्रसिद्ध 4 मंदिरे आहेत. शहराच्या आत केंद्रस्थानी असलेले रावळी महादेव मंदिरही लोकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर तब्बल 800 मंदिर जुने आहे. त्याचा इतिहासही अद्वितीय आहे.
असे म्हटले जाते की, अकबराच्या शासन काळात राजा मान सिंह अफगाणिस्तानच्या लढाईमध्ये गेले होते आणि तिथून परतत असताना अटक पर्वतावरुन भगवान शिव शंकराचे शिवलिंग वापस घेऊन परतले होते. ज्या जागेवर हे मंदिर आहे, इथे त्या शिंवलिंगाची स्थापना करण्यात आली होती. कालांतराने इंग्रजांशी संबंधित आणखी एक कथा प्रसिद्ध आहे.
advertisement
इंग्रज मंदिराच्या जवळून रेल्वेने जात होते. मात्र, मंदिर रस्त्याच्या मध्ये येत होते. यावेळी इंग्रजांनी मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना रेल्वे ट्रॅक मोडावा लागला.
असे पडले रावळी महादेव नाव -
मंदिराचे महंत सौरव शर्मा सांगतात की, रावली महादेवाच्या मंदिराचा इतिहास अकबराच्या शासन काळाशी संबंधित आहे. रावळी महादेव मंदिर, एमजी रोड मंदिराचा इतिहास मुघल बादशाह अकबराच्या शासनकाळात आमेरचे राजा मानसिंह युद्धासाठी अफगाणिस्तान गेले होते. त्यांना अटक पर्वतावर एक शिवलिंग मिळाले. ते शिवलिंग घेऊन जात होते, आज जिथे रावळी मंदिर आहे, तिथे त्यांनी ते शिवलिंग ठेवले. यानतंर शिवलिंग दुसरीकडे नाही घेऊन जाऊ शकले. मंदिराच्या आजूबाजूला रावळ राजपूत राहायचे, यामुळे याचे नाव रावळी महादेव मंदिर पडले.
इंग्रजही झाले अयशस्वी -
कालांतराने रावळी महादेव मंदिराशी संबंधित अनेक कथा प्रसिद्ध आहे. मात्र, यामध्ये सर्वात प्रसिद्ध कथा ही इंग्रजांशी संबंधित आहे. ब्रिटिश शासनकाळात आग्र्यामध्ये रेल्वे लाईन बनवण्यात आली, मात्र, मध्ये मंदिर होते. यामुळे येथील शिवलिंगाला या जागेवरुन दुसरीकडे काही अंतरावर विस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, यामध्ये इंजीनिअर सफल झाले नाहीत. यामुळे रेल्वे लाईनला मंदिराच्या समोर फिरवून बनवण्यात आले. इथे आजही रेल्वे ट्रॅकचा आकार एस (S) आकृतीमध्ये बनलेला दिसते.
भाविकांची इच्छा होते पूर्ण -
अशी मान्यता आहे की, मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकापना पूर्ण होते. यासाठी 11, 21, 41 दिवस भाविक नियमित जलाभिषेक करण्यासाठी येतात. प्रत्येक सोमवारी याठिकाणी यात्रा भरते आणि मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी भगवान महादेवाच्या दर्शनासाठी येतात.
या रावळी मंदिरात असे पोहोचा
रावळी शिव मंदिर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ आहे. या मंदिरात श्रावण सोमवारसोबतच शिवरात्रीला विशेष पूजा-अर्चनेसाठी भाविक पोहोचतात. तुम्हालाही येथे यायचे असेल, तर एमजी रोडवरुन तुम्ही याठिकाणी पोहोचू शकतात. मंदिराच्या बाजूला मुख्य दरवाज्यावर पार्किंगची व्यवस्था आहे.