पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म झाल्यामुळे हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही साजरा केला जातो. मात्र, याच दिवशी काही वस्तू खरेदी करणे अशुभ मानले गेले आहे. ज्योतिषांच्या मते,अशा काही वस्तू आहेत ज्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरी आणल्यास त्या विपरीत परिणाम करू शकतात.
1) झाडू खरेदी करू नका
advertisement
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाडू खरेदी करणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. पौराणिक कथेनुसार, परशुरामांच्या काळात एका असुराने गवताच्या रूपात वेष धारण करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्या गवतावर पाय पडल्यामुळे परशुराम आणि त्यांच्या मातेला धोका टळला. यानंतर असुराला शाप देण्यात आला की, पेंढ्यापासून बनवलेल्या वस्तू अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरात आणल्यास पाप वाढते, व त्या दिवशी केलेल्या उपासनेचा प्रभाव कमी होतो. म्हणूनच, झाडू किंवा गवतापासून बनवलेली कोणतीही वस्तू या दिवशी घरात आणू नये.
2) कवडी विशिष्ट संख्येने खरेदी नका करू
या दिवशी कवडी (कढई) खरेदी करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ३, ५, ७ किंवा ११ कवड्या घरी आणणे अशुभ मानले जाते. त्याऐवजी कवडींची जोडी (२) घरी आणणे अधिक शुभ मानले जाते. कारण कवडी ही देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे प्रतीक मानली जाते. जिथे देवी लक्ष्मीचा वास असतो, तिथे श्रीविष्णूंची उपस्थिती असते, असा विश्वास आहे. त्यामुळे आर्थिक समृद्धीसाठी या दिवशी कवडीची जोडी घरी आणणे अधिक फलदायी ठरते.
3) शुभ कार्यासाठी योग्य माहिती महत्त्वाची
अक्षय्य तृतीया हा सोने, जमीन, वाहन खरेदी, दानधर्म, लग्न व गृहप्रवेश यांसारख्या शुभकार्यांसाठी योग्य दिवस मानला जातो. मात्र, अशा शुभ मुहूर्तावर अज्ञानामुळे चुकीच्या वस्तू खरेदी केल्यास त्याचे उलट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे धार्मिक परंपरेप्रमाणे, अशा दिवशी कोणती खरेदी करावी आणि कोणती टाळावी, याची माहिती घेऊनच कृती करणे हितावह ठरते.