TRENDING:

तिळगूळ घ्या आणि गोड बोला! पण का बोलायचं बरं आणि तिळाचे लाडूच का घ्यायचे?

Last Updated:

अनेक ठिकाणी मकर संक्रांतीला वाहत्या पाण्यात तीळ-गूळ सोडले जातात. ज्यामुळे आयुष्यातील विविध अडचणी दूर होतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिना आजमी, प्रतिनिधी
मकर संक्रांत आणि तिळगूळ या समीकरणामागे एक अत्यंत रोमांचक कथा आहे.
मकर संक्रांत आणि तिळगूळ या समीकरणामागे एक अत्यंत रोमांचक कथा आहे.
advertisement

देहरादून : येत्या 15 जानेवारीला सर्वत्र मकर संक्रांत साजरी होईल. याच दिवशी सूर्याचा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. त्यामुळे मकर संक्रांतीला तीळ आणि गुळापासून बनवलेल्या पदार्थांचं वाटप करणं अत्यंत शुभ मानलं जातं.

उत्तराखंडची राजधानी असलेल्या देहरादूनचे ज्योतिषी पंडित योगेश कुकरेती सांगतात, मकर संक्रांतीला स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक काळी डाळ, तांदूळ आणि खिचडीसह गूळ आणि तिळाचे पदार्थ दान करतात. त्यामुळे शनी, राहू आणि केतूसह कुंडलीतील विविध दोष नष्ट होतात, असं मानलं जातं. शिवाय आयुष्यात कोणत्याही प्रकारची शनी साडेसाती सुरू असेल, तर त्यापासूनही सुटका मिळते.

advertisement

14 की 15, संक्रांत असते कधी? अयोध्येच्या ज्योतिषांकडून जाणून घ्या पूर्ण माहिती

तसंच तिळात गूळ मिसळल्यास सूर्यासह मंगळ दोष नष्ट होतात. अनेक ठिकाणी मकर संक्रांतीला वाहत्या पाण्यात तीळ-गूळ सोडले जातात. ज्यामुळे आयुष्यातील विविध अडचणी दूर होतात. खरंतर मकर संक्रांत आणि तिळगूळ या समीकरणामागे एक अत्यंत रोमांचक कथा आहे.

अशीही भक्ती, आई म्हणते बाळाला जन्म देईन तर 22 जानेवारीलाच! डॉक्टरांनाही काही सूचेना

advertisement

शास्त्रांनुसार, एकदा शनीचे पिता सूर्यदेव हे त्यांच्यावर प्रचंड रागावले होते. त्यावेळी शनीदेवांनी त्यांचा राग कमी करण्यासाठी काळ्या तिळांचा वापर केला. तेव्हा सूर्यदेव म्हणाले की, ज्या दिवशी ते मकर राशीत प्रवेश करतील, त्या दिवशी कोणी पूजेसाठी तीळ वापरले किंवा तिळाचं दान केलं, तर त्या व्यक्तीला सर्व शनीदोषांपासून मुक्ती मिळेल. तेव्हापासून मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाच्या पदार्थांचं दान करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आपण संक्रांतीला तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला, असं म्हणतो.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g

मराठी बातम्या/अध्यात्म/
तिळगूळ घ्या आणि गोड बोला! पण का बोलायचं बरं आणि तिळाचे लाडूच का घ्यायचे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल