श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन 2025 मध्ये द रोज क्लब च्या वतीने गुलाब फुलांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये 500 हून अधिक गुलाबाची फुले नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. गुलाबाच्या विविध जातीचे तसेच विविध रंगाचे सुवासिक गुलाब पाहण्याची संधी सोलापूरकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनात लाल, पिवळा, केशरी, जांभळा, गुलाबी, पांढरा विविध रंगातील 500 पेक्षा अधिक गुलाबाची फुले या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहेत.
advertisement
शेतकऱ्यांना गुलाबांच्या फुलांची आणि रोपांची माहिती व्हावी, शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गुलाबाची शेती करावी. या उद्देशाने यंदाच्या वर्षी श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये गुलाबांच्या फुलांचे प्रदर्शन भरवण्यात आले असल्याची माहिती प्रकाश बुतळा यांनी दिली. तर हे प्रदर्शन पाहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव, सोलापूरच्या सीमेलागत असलेला विजयपूर (कर्नाटक), पुणे, येथून नागरिक आणि शेतकरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत. तर या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये यंदाच्या वर्षी गुलाब फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे.





