14 की 15, संक्रांत असते कधी? अयोध्येच्या ज्योतिषांकडून जाणून घ्या पूर्ण माहिती
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ, अंथरूण आणि खिचडी दान करण्याचा सल्ला ज्योतिषी देतात. असं केल्यास कुंडलीतील सूर्य आणि शनी दोन्हीची स्थिती भक्कम होते.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : मकर संक्रांतीपासून हिंदू सणांना सुरुवात होते. देशाच्या विविध भागांमध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि दान करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. शिवाय याच दिवशी सूर्य ग्रहाचा मकर राशीत प्रवेश होतो, म्हणूनच या दिवसाला मकर संक्रांत म्हटलं जातं.
हिंदू पंचांगानुसार यंदा 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांत साजरी केली जाईल. अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मकर संक्रांतीला काळ्या तिळांचे उपाय करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे यश मिळतंच, शिवाय आयुष्यात सुख, समृद्धीही येते. त्यासाठी नेमके काय उपाय करायला हवे, पाहूया.
advertisement
मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ करावी. या पाण्यात काळे तीळ मिसळावे. शिवाय काळे तीळ मिसळलेलं पाणी सूर्याला अर्पण करावं. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात गंगेचं पाणी किंवा लाल चंदन आणि तीळ इत्यादी मिसळून सूर्य देवतेचा मंत्रजप केल्यास कुंडलीतील सूर्याची स्थिती भक्कम होते.
advertisement
मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ, अंथरूण आणि खिचडी दान करण्याचा सल्ला ज्योतिषी देतात. असं केल्यास कुंडलीतील सूर्य आणि शनी दोन्हीची स्थिती भक्कम होते. तसंच संक्रांतीच्या दिवशी तीळ-गुळाचं सेवन केल्यास सूर्य देवाची कृपा आपल्यावर कायम राहते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
January 03, 2024 11:47 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
14 की 15, संक्रांत असते कधी? अयोध्येच्या ज्योतिषांकडून जाणून घ्या पूर्ण माहिती