Weather Alert: शनिवारी दातखिळी बसवणारी थंडी, पारा 10 अंशाच्या खाली, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात डिसेंबर अखेर थंडीचा कडाका वाढला असून काही ठिकाणी पारा 10 अंशांच्या खाली गेला आहे. 27 डिसेंबरचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
राज्यात तापमानात चढ-उतार सुरू असले तरी थंडीला पोषक वातावरण कायम आहे. त्याने थंडीचा प्रभाव सर्वत्र जाणवत आहे. सकाळच्या वेळी हवेतील गारवा अधिक वाढला असून अनेक भागांत धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर, नाशिक आणि गोंदिया येथे किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले आहे. निफाड येथे 7 अंश सेल्सिअस इतकं राज्यातील नीचांकी तापमान नोंदवण्यात आलं आहे. 27 डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख शहरांमधील हवामानाची स्थिती कशी राहील? जाणून घेऊ.
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कायम आहे. पुणे शहरात 27 डिसेंबर रोजी कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. सकाळच्या वेळी पुणे आणि परिसरात धुक्याची शक्यता असून त्यामुळे वाहनचालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील इतरही शहरांत गारवा कायम आहे.
advertisement
advertisement
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक तीव्र झाला आहे. नाशिकमध्ये 27 डिसेंबर रोजी कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं राहणार असून हवामान विभागाकडून शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरले असून निफाड येथे 7 अंश सेल्सिअस इतकं राज्यातील नीचांकी तापमान नोंदवण्यात आलं आहे.
advertisement
advertisement
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात एकूणच तापमानाचा पारा खालच्या पातळीवर असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांचा वापर करावा, सकाळी व रात्री अनावश्यक बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






