Shani Sadesati : ती वेळ आलीच! या दिवसापासून वाईट काळ संपणार, ३ राशींची शनि साडेसाती दूर होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shani Sadesati : शनिची साडेसाती म्हटलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ केवळ अडचणींचा नसून आत्मपरीक्षण, मेहनत आणि जबाबदारी शिकवणारा टप्पा मानला जातो.
मुंबई : शनिची साडेसाती म्हटलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ केवळ अडचणींचा नसून आत्मपरीक्षण, मेहनत आणि जबाबदारी शिकवणारा टप्पा मानला जातो. साधारण साडेसात वर्षे चालणारा हा कालावधी प्रत्येक राशीच्या आयुष्यात कधीतरी येतोच. सध्या कुंभ, मीन आणि मेष राशींवर साडेसातीचे वेगवेगळे टप्पे सुरू आहेत. 2026 मध्ये या राशींवर याचा कसा परिणाम होईल आणि साडेसाती कधी संपेल, ते जाणून घेऊया.
advertisement
कुंभ रास – अंतिम टप्पा कुंभ राशीच्या व्यक्तींवर सध्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मागील काही वर्षांत अनेक जबाबदाऱ्या, कामाचा ताण आणि मानसिक दबाव यांचा सामना करावा लागला असेल. मात्र आता परिस्थिती हळूहळू सुधारण्याची चिन्हे दिसू लागतील. अडथळे दूर होतील आणि कामे मार्गी लागतील. शनि मेष राशीत प्रवेश करताच कुंभ राशीची साडेसाती संपेल. समाप्ती कालावधी – सुमारे ३ जून २०२७
advertisement
मीन रास – दुसरा टप्पा मीन राशीच्या लोकांसाठी सध्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू असून हा काळ तुलनेने अधिक आव्हानात्मक ठरू शकतो. मानसिक ताण, वाढलेल्या जबाबदाऱ्या यांचा अनुभव येऊ शकतो. मात्र या काळात केलेल्या मेहनतीचे फळ पुढील काळात नक्की मिळेल, त्यामुळे संयम राखणे महत्त्वाचे आहे. समाप्ती कालावधी – सुमारे ८ ऑगस्ट २०२९
advertisement
मेष रास – पहिला टप्पा मेष राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा नुकताच सुरू झाला आहे. 29 मार्च 2025 पासून हा कालावधी सुरू झाला असून सुरुवातीच्या टप्प्यात अचानक आव्हाने येण्याची शक्यता असते. त्यामुळे निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक पावले उचलणे गरजेचे आहे. हळूहळू परिस्थिती स्पष्ट होऊ लागेल. समाप्ती कालावधी – अंदाजे २०३२ ते २०३३ दरम्यान
advertisement







