पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या हातावरील रेषा त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत अनेक रहस्ये प्रकट करते. यावरून ती व्यक्ती किती भाग्यवान आणि श्रीमंत होऊ शकते, हे दिसून येते. जाणून घेऊ हाताच्या रेषांवरून माणसाचा स्वभाव कसा ओळखता येतो.
हस्तरेषा शास्त्रानुसार हस्तरेषांमध्ये शुक्र आणि गुरु पर्वताचा उदय खूप शुभ मानला जातो. ज्यांच्या तळहातावर हे दोन्ही पर्वत असतात, ते खूप भाग्यवान असतात. त्यांचे जीवन खूप आनंदी असते. अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. देवस्थान शुक्र आणि गुरु पर्वताच्या मध्ये असते. असे मानले जाते की, हे ठिकाण जितके खोलगट असेल तितके त्या व्यक्तीचे नशीब चांगले असते.
advertisement
कुठे असतो शुक्र पर्वत - शास्त्रानुसार शुक्र पर्वत मणिबंधाच्यावर आणि अंगठ्याच्या खाली असतो. शुक्र पर्वताची खोली सांगते की, ती व्यक्ती सुखांसाठी अधिक प्रयत्न करतेय. अशा लोकांच्या आयुष्यात संपत्तीची कमतरता नसते. असे लोक सौंदर्य पाहून लवकर आकर्षित होतात.
आजचं अंकशास्त्र! प्रयत्नांना नशिबाची उत्तम साथ; या 3 मूलांकांसाठी लकी काळ
शुक्र पर्वतावर त्रिकोणी चिन्ह असणे शुभ मानले जाते. अशा लोकांवर देवतांची कृपा कायम राहते. त्यांच्या जीवनात सदैव सुख-समृद्धी नांदत असते.
गुरु पर्वत कोठे असतो- तर्जनीजवळ पसरलेल्या भागाला गुरु पर्वत म्हणतात. गुरू पर्वक जितका स्वच्छ आणि खोलगट असेल तितकेच माणसाचे जीवन भाग्यवान असते. अशा व्यक्ती आपली ठरवलेली ध्येय पूर्ण करत राहते. त्यांना आयुष्यात लवकर यश मिळतं. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. गुरु पर्वतावर विशेष चिन्ह असणे शुभ असते. जर गुरूच्या पर्वतावर क्रॉसचे चिन्ह असेल तर त्याच्या आयुष्यात नेहमीच प्रेम राहते.
कष्टाला फळ नाही! शनि-राहुचा प्रकोप या राशींची शांती भंग करणार, आर्थिक हानी
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)