TRENDING:

अमावस्या आणि ग्रहणाचा दुर्मिळ योग, आज एक चूकही पडणार महागात; कोणती चूक टाळायची थेट शास्त्रातच सांगितलंय!

Last Updated:

आज माघ महिन्यातील 'माघ अमावस्या' आणि वर्षातील पहिले 'सूर्यग्रहण' असा अत्यंत दुर्मिळ आणि संवेदनशील योग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रात अमावस्या ही पितरांच्या कार्यासाठी महत्त्वाची मानली जाते, तर सूर्यग्रहण हे राहू-केतूच्या प्रभावामुळे नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. जेव्हा हे दोन योग एकत्र येतात, तेव्हा वातावरणातील लहरी अधिक प्रबळ होतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Amavasya- Surya Grahan : आज माघ महिन्यातील 'माघ अमावस्या' आणि वर्षातील पहिले 'सूर्यग्रहण' असा अत्यंत दुर्मिळ आणि संवेदनशील योग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रात अमावस्या ही पितरांच्या कार्यासाठी महत्त्वाची मानली जाते, तर सूर्यग्रहण हे राहू-केतूच्या प्रभावामुळे नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. जेव्हा हे दोन योग एकत्र येतात, तेव्हा वातावरणातील लहरी अधिक प्रबळ होतात. अशा वेळी नकळत केलेली एक छोटीशी चूक देखील तुमच्या कुटुंबावर आणि आर्थिक स्थितीवर भारी पडू शकते. शास्त्रात या विशेष दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबद्दल कडक नियम सांगितले आहेत.
News18
News18
advertisement

अमावस्या आणि ग्रहणाचा दुर्मिळ योगात 'या' चुका टाळा

तामसिक आहार आणि नशा टाळा

शास्त्रानुसार, अमावस्येच्या दिवशी आणि ग्रहण काळात मानवी मन आणि रक्ताभिसरण प्रक्रियेत बदल होतात. शास्त्रानुसार, या दिवशी मांसाहार, कांदा-लसूण आणि मद्यपान करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. असे केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम तर होतोच, पण घरात दारिद्र्य आणि भांडणे वाढतात.

advertisement

वाद-विवाद आणि रागावर नियंत्रण

आजच्या दिवशी चंद्र आणि सूर्य हे दोन्ही ग्रह पीडित असतात, ज्यामुळे माणसाची चिडचिड वाढते. कोणाचाही अपमान करणे, खोटे बोलणे किंवा घरामध्ये कलह करणे टाळा. विशेषतः घरातील वडीलधारे आणि स्त्रियांचा अपमान केल्यास पितृदोष बळावतो, ज्यामुळे प्रगतीत अडथळे येतात.

नवीन कार्याची सुरुवात नको

आज ग्रहण आणि अमावस्या असल्याने शास्त्रानुसार, नवीन व्यवसाय, गृहप्रवेश, साखरपुडा किंवा मोठी खरेदी करणे टाळावे. या काळात सुरू केलेली कामे अनेकदा पूर्ण होत नाहीत किंवा त्यात मोठे अडथळे येतात. आजचा दिवस केवळ भक्ती आणि दानधर्मासाठी राखून ठेवावा.

advertisement

रात्री निर्जन ठिकाणी जाणे टाळा

अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात. त्यात ग्रहण योगामुळे ही ऊर्जा अधिक प्रभावशाली होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्मशानभूमी, चौफुली किंवा निर्जन नदीकाठी जाणे टाळावे. यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती असते.

शास्त्र काय सांगतं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ट्रेंडिंग चॉकलेट बाउल, 70 रुपयांपासून चाखा चवं,मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

शास्त्रानुसार, सूर्य हा आत्मा आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. जेव्हा सूर्याला ग्रहण लागते आणि अमावस्येला चंद्र क्षीण होतो, तेव्हा माणसाचे आत्मबळ आणि मन दोन्ही कमकुवत होतात. म्हणून, या दिवशी शारीरिक श्रमापेक्षा मानसिक उपासनेला जास्त महत्त्व दिले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
अमावस्या आणि ग्रहणाचा दुर्मिळ योग, आज एक चूकही पडणार महागात; कोणती चूक टाळायची थेट शास्त्रातच सांगितलंय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल