त्यावेळी चेदी नावाचा एक देश होता, ज्याचा राजा पुरू वंशातील उपरिचर वासू होता. उपरिचर हा इंद्राचा मित्र होता. तो त्याच्या विमानातून आकाशात प्रवास करत असे, म्हणूनच त्याचं नाव उपरिचर पडलं. उपरिचराच्या राजधानीजवळ शुक्तिमात नावाची एक नदी होती. एके दिवशी राजा शिकारीला गेला. मग त्याला त्याची सुंदर पत्नी गिरिका आठवू लागली. यामुळे तो कामोत्तेजित झाला. तेव्हा त्याचं वीर्यस्खलन झालं. त्याने ते गरुडाला देऊन त्याच्या पत्नीला द्यायला सांगितलं.
advertisement
नदीत पडलं वीर्य, मासा प्रेग्नंट
गरुड ते घेऊन उडत तेव्हा वाटेतच त्याच्यावर हल्ला झाला आणि वीर्य नदीत पडलं. त्यावेळी अद्रिका नावाची एक अप्सरा नदीत राहत होती. ब्रह्मदेवाच्या शापामुळे ती माशात बदलली होती. नदीत पडलेलं हे वीर्य तिनं सेवन केलं आणि ती गर्भवती झाली.
त्यानंतर एका मच्छीमाराने जाळं टाकलं. एक मोठा मासा त्याच्या जाळ्यात अडकला, हा मासा म्हणजे अद्रिकाच होती. मच्छीमाराला माशाच्या पोटात एक मुलगा आणि एक मुलगी आढळली. त्यानंतर अप्सरा शापातून मुक्त झाली आणि आकाशात गेली. तर मच्छिमार दोन्ही मुलांना घेऊन राजा उपरिचरकडे गेला. राजाने मुलाला दत्तक घेतलं, जो नंतर मत्स्य नावाचा धार्मिक राजा बनला. तर मुलगी मच्छिमाराला दिली.
मुलीच्या शरीरातून माशाचा वास
मुलगी जसजशी मोठी होत गेली तसतशी ती अधिकाधिक सुंदर होत गेली. ती मच्छिमारांच्या वसाहतीत मच्छीमारांसोबत राहत असल्याने तिचं नाव मत्स्यगंधा ठेवण्यात आलं. तिचं दुसरे नाव योजगंधा होतं. माशाच्या पोटातून जन्म झाल्यामुळे तिच्या शरीराला माशासारखा वास येत होता. नंतर तिच्या शरीरातून एक मोहक वास येऊ लागला, यामागेही एक कथा आहे.
माशाचा वास मोहक सुगंधात कसा बदलला?
मत्स्यगंधा लोकांना नावेतून यमुना ओलांडून घेऊन जात असे. एके दिवशी ऋषी पराशर तिथे पोहोचले. ऋषींना यमुना ओलांडायची होती. ते मत्स्यगंधाच्या नावेत बसले. या काळात त्यांनी सत्यवतीला सांगितलं की त्यांना तिच्या जन्माची जाणीव आहे. त्यांना तिच्यापासून मुलगा होण्याची इच्छा आहे. सत्यवतीने संकोच केला. मग ऋषी पराशर म्हणाले की त्यांच्याशी संभोग केल्यानंतरही ती कुमारी राहील आणि तिच्या शरीरातील माशांचा वास नाहीसा होईल. त्याची जागा मोहक सुगंध घेईल. मग सत्यवती सहमत झाली.
Mahabharat : महाभारतातील शकुनी मामाच्या मृत्यूनंतर त्याच्या मायावी फाशांचं काय झालं?
पण आणखी एक समस्या होती. बरेच लोक ऋषी पराशर आणि सत्यवती यांना नावेत पाहत होते. त्यांच्यामध्ये ऋषी आणि मुनी होते. मग सत्यवतीने संकोचून म्हटलं की ती हे कसं करू शकते, सर्वजण पाहत आहेत. मग ऋषींनी काही मंत्र म्हटला आणि नावेभोवती धुक्याची एक दाट चादर तयार झाली की कोणीही त्यांना पाहू शकलं नाही. ऋषी पराशर यांच्याशी झालेल्या मिलनातून तिने व्यासांना जन्म दिला. त्यानंतर ती पुन्हा कुमारी झाली. तिच्या शरीरातून मोहक सुगंध येऊ लागला.
एके दिवशी राजा शंतनू यमुनेच्या काठाजवळील जंगलात होता तेव्हा त्यांना हा मोहक सुगंध जाणवला आणि नंतर काही अटी मान्य करत त्यांनी मत्स्यगंधा म्हणजेच सत्यवतीशी लग्न केलं.