महाभारत हा भारतीय इतिहासाचा एक अध्याय आहे जो स्वतःमध्ये अनेक रहस्ये दडवून ठेवतो. महाभारतासारखं मोठं युद्ध 18 दिवसांतच कसं संपलं? यामागे अनेक कारणे दिली आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया.
भीष्म पितामह यांना मिळाले वरदान : भीष्म पितामह यांना इच्छामृत्यूचं वरदान मिळालं होतं. त्यांनी पांडवांना त्यांच्या मृत्युचं रहस्य सांगितलं होतं, त्यानुसार जर शिखंडी त्यांच्यासमोर असेल तर ते शस्त्र उचलणार नाहीत. अर्जुनने ही युक्ती वापरली आणि भीष्मांवर बाण सोडले. त्यानंतर ते बाणांच्या शय्येवर पडले आणि युद्धाच्या दहाव्या दिवशी त्यांनी आपले प्राण सोडले. भीष्मांच्या पतनामुळे कौरव सैन्याचं मनोबल खचलं.
advertisement
युद्धाचे नियम : महाभारताच्या युद्धाचे काही नियम होते जे दोन्ही बाजूंना पाळावे लागत होते. सूर्यास्तानंतर युद्ध थांबवण्यात येत असे आणि सैन्य रात्री विश्रांती घेत असत. यामुळे युद्धाचा कालावधी मर्यादित झाला.
Mahabharat : महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णाने कुरूक्षेत्रच का निवडलं? या जागेत खास काय?
दोन्ही बाजूंचे शक्तिशाली सैन्य : कौरव आणि पांडव दोघांकडेही महारथी, योद्धे आणि शस्त्रे असलेले शक्तिशाली सैन्य होते. दोन्ही बाजूंमध्ये भयंकर युद्ध झाले ज्यामुळे अल्पावधीतच मोठे नुकसान झाले आणि युद्ध लवकर संपले.
कृष्णाची रणनीती : भगवान श्रीकृष्णाने पांडवांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या कूटनीतीद्वारे त्यांना विजयाकडे नेलं. त्यांच्या रणनीतींमुळे युद्धाचे स्वरूप बदललं आणि कौरवांचा पराभव झाला.
काळाचं चक्र : काही विद्वानांचा असा विश्वास आहे की महाभारत युद्ध एका विशिष्ट वेळेसाठी होणार होतं. ती एक दैवी योजना होती ज्याचं उद्दिष्ट धर्माची स्थापना करणं होतं.
Mahabharat : मृत झाला होता राजा, राणीने ठेवले संबंध, 7 मुलांचा जन्म; विज्ञानही म्हणतं शक्य आहे
या सर्व कारणांच्या संयोजनामुळे महाभारताचे युद्ध केवळ 18 दिवसांत संपले. हे युद्ध आजही आपल्याला धर्म, न्याय आणि कर्तव्याचे धडे देतं.