भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या जवळ गेले, 'तुला काही बोलायचंय का', असं त्यांनी त्याला विचारलं. त्यावर दुर्योधनानं सांगितलं की, त्यानं महाभारताच्या युद्धावेळी 3 चुका केल्या. त्या चुकांमुळेच तो युद्ध जिंकू शकला नाही आणि आज त्याची ही परिस्थिती झाली. जर त्यानं आधीच या चुका जाणल्या असत्या तर आज विजयी झाला असता, असं त्याचं म्हणणं होतं.
advertisement
भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत शांतपणे दुर्योधनाला त्याच्या चुका विचारल्या, त्यावर दुर्योधनानं पहिली चूक सांगितली की, त्यानं नारायणाच्या स्थानी नारायणाच्या सैन्याला निवडलं. जर नारायण कौरवांच्या बाजूनं असते तर निकाल काहीतरी वेगळाच लागला असता, असं तो म्हणाला.
दुर्योधनानं दुसरी चूक अशी सांगितली की, आपल्या आईनं विरोध करूनही तो पानांचं लंगोट घालून त्यांच्यासमोर गेला. जर नग्नावस्थेत गेला असता तर त्याला कोणताही योद्धा पराभूत करू शकला नसता.
तिसरी आणि अंतिम चूक ही सांगितली की, त्याचं स्वत:चं युद्धात सर्वात शेवटी जाणं. जर तो आधीच गेला असता, तर काही गोष्टी त्याला आधीच कळल्या असत्या. कदाचित त्याच्या भावंडांचा, मित्रांचा जीव वाचला असता.
भगवान श्रीकृष्णांनी शांतपणे दुर्योधनाचं सारंकाही ऐकून घेतलं. मग ते म्हणाले, 'तुझ्या पराभवाचं मुख्य कारण म्हणजे तुझं अधर्मी वागणं आणि स्वत:च्याच कुलवधूचं वस्त्रहरण करणं. तू स्वत: तुझ्या कर्मांनी तुझं भाग्य लिहिलंस. श्रीकृष्णांच्या बोलण्याचं तात्पर्य हे होतं की, दुर्योधन त्याच्या 3 चुकांमुळे नाही, तर अधर्मी असल्यामुळे हरला. हे ऐकून दुर्योधनाला आपल्या चुकांचा पश्चात्ताप झाला.