TRENDING:

सकाळी महादेवाच्या पूजेचा मुहूर्त चुकला, तरी घाबरू नका; संध्याकाळी 'या' वेळेत करू शकता पूजा!

Last Updated:

आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात आहे. अनेक वेळा कामाच्या व्यापामुळे किंवा इतर काही कारणांमुळे भाविकांना सकाळी लवकर मंदिरात जाऊन किंवा घरी महादेवाची पूजा करणे शक्य होत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mahashivratri Puja Muhurt : आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात आहे. अनेक वेळा कामाच्या व्यापामुळे किंवा इतर काही कारणांमुळे भाविकांना सकाळी लवकर मंदिरात जाऊन किंवा घरी महादेवाची पूजा करणे शक्य होत नाही. मात्र, शास्त्रानुसार महाशिवरात्रीची पूजा ही केवळ सकाळीच नाही, तर संध्याकाळी आणि मध्यरात्री करणे अधिक फलदायी मानले जाते. शिवपुराणानुसार, महाशिवरात्रीच्या रात्रीचे चार प्रहर पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. जर तुमची सकाळची पूजा चुकली असेल, तर संध्याकाळच्या पूजेसाठी हे मुहूर्त अत्यंत शुभ मानले जात आहेत.
News18
News18
advertisement

संध्याकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त

महाशिवरात्रीला संध्याकाळच्या पूजेला 'प्रदोष काळ' पूजा म्हटले जाते. सूर्यास्तानंतरचा काळ महादेवाच्या पूजेसाठी सर्वोत्तम असतो. संध्याकाळी 6:15 ते रात्री 9:00 वाजेपर्यंतचा काळ पूजेसाठी अतिशय शुभ आहे. जर तुम्हाला संध्याकाळीही वेळ मिळाला नाही, तर रात्री 11:55 ते 12:45 या काळात 'निशीथ काळ' पूजा करू शकता. हा काळ साक्षात महादेवाच्या प्रकटीकरणाचा मानला जातो.

advertisement

संध्याकाळच्या पूजेची विधी

संध्याकाळी पूजा करताना पुढील पद्धत अवलंबल्यास सकाळी पूजा न केल्याची कमतरता भरून निघते. संध्याकाळी पूजेपूर्वी पुन्हा एकदा हात-पाय धुवावेत किंवा शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. शिवलिंगावर पंचामृत अर्पण करावे आणि त्यानंतर शुद्ध जलाने अभिषेक करावा. महादेवाला 3 बेलपत्रे आणि अखंड अक्षता अर्पण कराव्यात. संध्याकाळी महादेवासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने घरातील दारिद्र्य दूर होते.

advertisement

काय काळजी घ्यावी?

संध्याकाळी पूजा करताना महादेवाला अर्पण केलेले पदार्थ स्वतः खाऊ नका. पूजेत तुळस किंवा हळद वापरू नका. शांत आणि स्थिर चित्ताने केवळ 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा जप करा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मालामाल करणारी रताळी शेती, 5 एकरांत 750 क्विंटल उत्पादन, शेतकऱ्याला 8 लाख नफा
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
सकाळी महादेवाच्या पूजेचा मुहूर्त चुकला, तरी घाबरू नका; संध्याकाळी 'या' वेळेत करू शकता पूजा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल