1. स्वप्नात काळा साप दिसणं : जर स्वप्नात सतत काळा साप दिसला, तर समजून जायचं की आता आपल्या वाटचं दुःख लवकरच संपून आयुष्यात प्रचंड आनंद येणार आहे.
2. सकाळी शंखाचा आवाज ऐकू येणं : एखाद्या दिवशी झोपेतून जाग येताच शंखाचा आवाज ऐकू आला किंवा स्वप्नात शंखनाद झाला, तर तुमच्यावर देवी-देवतांची कृपा झाली हे समजून जायचं. कारण हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. त्यामुळे अडचणी लवकरच संपणार हे निश्चित होतं.
advertisement
संकटात कोणी हात दिला नाही! या राशींचे आता नशीब उजळणार; भाग्योदय जवळ आलाय
3. तळहाताला खाज येणं : पुरुषांच्या उजव्या आणि महिलांच्या डाव्या तळहातावर खाज आली की समजून जायचं धनलाभ योग निर्माण झाला आहे. आता आपल्याला अचानक पैसे मिळू शकतात.
4. स्वप्नात मंत्र ऐकू येणं : स्वप्नात पूजेचे मंत्रोच्चार ऐकू येणं ही चांगल्या दिवसांची नांदी असते. त्यामुळे आता आपलं आयुष्य आनंदाने बहरणार आहे, हे समजून जायचं.
5. घरातलं वातावरण शांत असणं : घरात सतत वाद होणं अशुभ मानलं जातं. परंतु जर घरातलं वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न असेल तर येणारे दिवसही आपल्यासाठी शुभ असतात.
शनिवारी या मंत्रांचा जप करणं शुभ फळदायी; शनिदेव कृपा करतात, संकटे टळतील
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
