TRENDING:

Durga Ashtami: आज मासिक दुर्गाष्टमीला घरी न चुकता करायला हव्यात या गोष्टी; कुटुंबाच्या प्रगतीला पूरक

Last Updated:

Masik Durga Ashtami: आज 24 फेब्रुवारी, मंगळवारी येणारी ही अष्टमी अनेक लोकांसाठी आशेचा किरण ठरू शकते. या दिवशी काही साधे उपाय करून जीवनातील अडचणी कमी करता येतात, त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिंदू धर्मात दुर्गा देवीची पूजा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देवी दुर्गेची पूजा करणं शुभफळदायी मानलं जातं. प्रत्येक महिन्याला मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाते. घरगुती कटकटी, पैशांची चणचण किंवा कामात येणाऱ्या अडचणी यावर मात करण्यासाठी या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते. आज 24 फेब्रुवारी, मंगळवारी येणारी ही अष्टमी अनेक लोकांसाठी आशेचा किरण ठरू शकते. या दिवशी काही साधे उपाय करून जीवनातील अडचणी कमी करता येतात, त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
News18
News18
advertisement

कौटुंबिक सुख आणि शांतीसाठी - आजच्या काळात धावपळीमुळे रिलेशनमध्ये ताण-तणाव निर्माण होतो. अशा वेळी देवीला लाल चुनरी अर्पण करून सर्व मंगल मांगल्ये या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि घरातील वातावरण सुधारते. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा सकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

आर्थिक अडचणी आणि कर्जावर उपाय - पैशांची गुंतवणूक किंवा वाढते खर्च यामुळे येणारा मानसिक दबाव कमी करण्यासाठी देवीच्या पूजेत पाच पांढऱ्या कवड्यांचा वापर करणे शुभ मानले जाते. पूजेनंतर या कवड्या तिजोरीत ठेवल्याने धनलाभ होतो आणि कर्जातून सुटका मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

advertisement

व्यापार आणि नोकरीत यश मिळवण्यासाठी - करिअरमध्ये प्रगती होत नसेल किंवा व्यवसायात अडचणी येत असतील, तर एकाक्षी नारळाचा उपाय सांगितला जातो. नारळाला लाल धागा गुंडाळून तो देवीला अर्पण केल्याने कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

चंद्रग्रहणाचा सूतक काळ लागणार, कोणाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारापूर्वी न चुकता

advertisement

मानसिक समाधान आणि आरोग्य - मासिक दुर्गाष्टमी हा दिवस केवळ धार्मिक विधींचा नसून स्वतःकडे बघण्याचाही आहे. उपवास आणि ध्यान केल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते. यामुळे मनातली भीती आणि असुरक्षितता कमी होऊन एक प्रकारचे भावनिक बळ मिळते.

माणसाला नरकाच्या दाराशी नेणाऱ्या 3 गोष्टी; श्रीकृष्णाने भगवद् गीतेत सांगितलंय..

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबला 13000 रुपये भाव, आल्याचे दरही सुधारले, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

पूजा करताना पाळण्याचे नियम - अष्टमीच्या दिवशी स्वच्छ राहणे, घरातील देव्हारा नीट ठेवणे आणि मनोभावे दिवा लावणे महत्त्वाचे आहे. उपायांपेक्षा तुमची श्रद्धा जास्त फलदायी ठरते. शक्य असल्यास कन्या पूजन केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते.

मराठी बातम्या/अध्यात्म/
Durga Ashtami: आज मासिक दुर्गाष्टमीला घरी न चुकता करायला हव्यात या गोष्टी; कुटुंबाच्या प्रगतीला पूरक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल