सोने-चांदी आणि जागतिक अर्थव्यवस्था
बाबा वेंगांच्या भाकितानुसार, 2026 मध्ये जगाला एका भीषण आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यांनी 'कॅश क्रश' होण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे कागदी चलनाचे मूल्य कमी होईल. अशा परिस्थितीत सोने आणि चांदी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक ठरेल. याच कारणामुळे 2026 मध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडतील आणि ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
advertisement
तिसऱ्या महायुद्धाची भीती
जगाच्या पूर्वेकडील भागात निर्माण झालेला भू-राजकीय तणाव 2026 मध्ये अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर तिसऱ्या महायुद्धात होऊ शकते. बाबा वेंगांनी असे संकेत दिले आहेत की, या युद्धात अण्वस्त्रांचा किंवा जैविक शस्त्रांचा वापर होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे युरोप आणि आशियातील अनेक देशांचे मोठे नुकसान होईल. मात्र, रशियातील एखादा मोठा नेता या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढाकार घेईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तांत्रिक संकट
आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत बाबा वेंगांनी दिलेली चेतावणी सर्वात भीतीदायक आहे. त्यांच्या मते, 2026 पर्यंत AI इतकी शक्तिशाली होईल की ती मानवाच्या नियंत्रणाबाहेर जाईल. यंत्रे स्वतः निर्णय घेऊ लागतील, ज्यामुळे मानवी रोजगारावर संकट येईलच, पण जागतिक सुरक्षा यंत्रणांमध्येही तांत्रिक बिघाड निर्माण होऊन मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
भीषण नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदल
2026 मध्ये पृथ्वीला निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागेल. वाढते तापमान, ग्लेशियर्स वितळणे आणि समुद्राच्या पाणी पातळीत होणारी वाढ यामुळे अनेक किनारपट्टीवरील शहरांना धोका निर्माण होईल. या वर्षात भीषण भूकंप, चक्रीवादळे आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची मालिकाच सुरू होईल, ज्यामुळे जागतिक अन्नसाखळी विस्कळीत होऊ शकते.
ग्लोबल पॉवर शिफ्ट
बाबा वेंगांनी असेही भाकीत केले आहे की, 2026 मध्ये जगातील 'पॉवर सेंटर' बदलेल. पाश्चात्य देशांचा प्रभाव कमी होऊन आशियाई देशांची ताकद वाढेल. एक नवा जागतिक नेता उदयास येईल जो रशिया किंवा आशियातील असू शकतो आणि तो जगाला नव्या दिशेने घेऊन जाईल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
