मुरादाबाद : बागेश्वर धामचे बाबा पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे नाव आता संपूर्ण देशात माहिती झाले आहे. देशात त्यांचे लाखो भाविक भक्त आहेत. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात. आता त्यांनी एक मोठं विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
advertisement
बागेश्वर धामचे बाबा पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या मुरादाबाद इथे आले आहे. याठिकाणी चार दिवसीय हनुमान कथेचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी त्यांचा दिव्य दरबार भरला होता. यासोबतच प्रेत दरबारही भरला होता. यामध्ये नेहमीप्रमाणे अनेकांच्या चिठ्ठ्या खोलल्या आणि त्यांच्या समस्यांचे समाधानही करण्यात आले. यानंतर त्यांनी सर्व सनातनी लोकांना आशीर्वादही दिला. लोकांचे कष्ट दूर व्हावेत यासाठी त्यांनी हनुमानाची पूजा अर्चना करावी, असे त्यांनी सांगितले.
गच्चीवर, खिडकीवर किंवा दरवाजावर, तुमच्या घरीही येतो कावळा; जाणून घ्या, हे शुभ आहे की अशुभ?
याचवेळी त्यांनी बोलताना मुघल शासक बाबरवरही हमला केला. पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी मुरादाबादचे नाव बदलून माधव नगर करण्याची मागणी केली आहे. यासोबतच ते म्हणाले की, 'मुरादाबाद आणि माधव नगरच्या लोकांकडे पाहता हे शहर पूर्णपणे भगवामय झाले आहे. या लोकांकडे पाहून आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून सनातनची क्रांती झाल्याचे दिसते. आता मला असे वाटत आहे की, बाबरसुद्धा जय श्री राम म्हणेल' पण असो. आता तो आहे किंवा नाही, हा वेगळा विषय आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, याचवेळी याठिकाणी एक मुलगा आला होता. त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला विनंती केली होती की त्याला बाबांची भेट घ्यायची आहे. यावेळी या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला सांगितले की, माझा असा कोणताही परिचय नाही. याठिकाणी माझी ड्युटी लागली आहे आणि ड्युटी करत आहे. यानंतर त्या मुलाची चिठ्ठी निघाली त्याला बोलावत त्याच्या समस्येचे समाधान केले.
यानंतर त्या मुलाने त्या पोलीस कर्मचाऱ्याबाबत सांगितले. मी त्यांना विनंती केली पण ते म्हणाले की, माझी याठिकाणी कोणतीही ओळख नाही. त्यामुळे माझी इच्छा आहे की, तुम्ही त्या पोलीस कर्मचाऱ्यालाही बोलवावे आणि त्यांना आशीर्वाद द्यावा. यानंतर बाबांनी त्यांना बोलावले आणि त्यांच्याही समस्येचे समाधान केले.