TRENDING:

महिन्याभरात दुसऱ्यांदा बदलणार बुध चाल, 'या' राशीच्या व्यक्तींचं उत्पन्न वाढणार!

Last Updated:

या काळात उत्पन्नात कमालीची वाढ होईल. शिवाय उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील. महत्त्वाचं म्हणजे पूर्वीच्या एखाद्या गुंतवणूकीतून आता फायदा होण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नीरज कुमार, प्रतिनिधी
खरंतर 'या' राशीच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचे दोन्ही राशीप्रवेश फलदायी ठरणार आहेत.
खरंतर 'या' राशीच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचे दोन्ही राशीप्रवेश फलदायी ठरणार आहेत.
advertisement

बेगुसराय, 14 नोव्हेंबर : ग्रहांमध्ये युवराज मानला जाणारा बुध ग्रह येत्या काही दिवसांमध्ये धनू राशीत प्रवेश करणार आहे. या राशीप्रवेशाचा बँकिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आणि विद्यार्थ्यांवर विशेष प्रभाव पडेल. बुध ग्रहाला व्यापार, बुद्धी, तर्कशक्ती, अर्थव्यवस्था, वाणी आणि संवादाचा जनक मानलं जातं. त्यामुळे त्याच्या स्थितीचा या सर्व गोष्टींशी संबंध असतो.

बुध साधारण महिन्याभरात एकदाच आपली चाल बदलतो. मात्र नोव्हेंबर महिन्यात दोनवेळा हा योग आला आहे. 6 नोव्हेंबरला बुध ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केला होता. तर, आता 25 नोव्हेंबरला त्याचा धनूप्रवेश होणार आहे. याचा सर्वच राशींवर प्रभाव पडेल, त्यापैकी भाग्यवंत राशी कोणत्या पाहूया.

advertisement

नो कन्फ्युजन! भावाला याच मुहूर्तावर ओवाळा, दिशाही लक्षात घ्या

बेगुसरायचे ज्योतिषी पंडित रिपूसुदन ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुध ग्रहाच्या धनूप्रवेशाचा प्रभाव बँकिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आणि विद्यार्थ्यांवर पडणार आहे. हा प्रभाव नकारात्मक असेल, त्यामळे या व्यक्तींना नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. त्यांनी नव्या कार्याची सुरुवात करताना सावधगिरी बाळगावी, असा सल्ला ज्योतिषांनी दिला.

advertisement

हिरा परवडणार नाही, मग 'हा' रत्न करा खरेदी! भाग्याचा दरवाजा उघडेल

ज्योतिषांनी सांगितलं की, हा राशीप्रवेश मेष, कन्या आणि मकर राशीसाठी शुभ ठरेल. खरंतर या राशीच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचे दोन्ही राशीप्रवेश फलदायी ठरणार आहेत. या काळात त्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ होईल. शिवाय उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील. महत्त्वाचं म्हणजे त्यांना पूर्वीच्या एखाद्या गुंतवणूकीतून आता फायदा होण्याची शक्यता आहे. तसंच नोकरीत बढती मिळेल, विद्यार्थ्यांसाठी करियरच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g

मराठी बातम्या/अध्यात्म/
महिन्याभरात दुसऱ्यांदा बदलणार बुध चाल, 'या' राशीच्या व्यक्तींचं उत्पन्न वाढणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल