रविवार आणि रथ सप्तमीचा खास संयोग - पद्म पुराणानुसार माघ सप्तमीच्या दिवशीच सूर्यदेवाची पहिली किरणे पृथ्वीवर पडली होती. यावर्षी रथ सप्तमी रविवारी येत आहे, हा एक अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे कारण रविवारचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे. रविवारी ही तिथी आल्यामुळे तिचे आध्यात्मिक महत्त्व अधिकच वाढले आहे. या दिवशी भगवान सूर्याची आराधना केल्याने आरोग्य, दीर्घायुष्य, तेज आणि यश प्राप्त होते अशी मान्यता आहे.
advertisement
धर्मशास्त्रात रथ सप्तमीच्या दिवशी मिठाचा त्याग करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. या दिवशी खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये मिठाचा वापर करू नये. असे मानले जाते की जो व्यक्ती या दिवशी मिठाचा त्याग करतो, त्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते आणि पूर्ण वर्षातील सप्तमी व्रतांचे पुण्य फळ मिळते. आयुर्वेदामध्ये मीठ हे राजसिक मानले जाते, जे शरीरात उत्तेजना वाढवते. रथ सप्तमीला शरीर आणि मन शुद्ध करण्याचा विधी असतो, त्यामुळे मिठाचा त्याग केल्याने शरीराचे नैसर्गिक शुद्धीकरण (डिटॉक्स) होते आणि मानसिक प्रसन्नता मिळते.
रथ सप्तमीचे महत्त्व आणि आरोग्य - रथ सप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणण्यामागे विज्ञानाचाही आधार आहे. बदलत्या ऋतूमध्ये सूर्याची किरणे शरीराला नवी ऊर्जा देतात. या दिवशी सूर्यस्नान आणि सूर्योपासना केल्याने अनेक व्याधींपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. या दिवशी केवळ गोड पदार्थांचे सेवन करणे शुभ मानले जाते, ज्यामुळे शरीरातील सात्विक वृत्ती वाढते.
पुढचे 4 महिने धोक्याचे! कर्कसह 3 राशींच्या वाट्याला त्रास; उत्तराभाद्रपदेत शनी
व्रत आणि पूजा विधी - रथ सप्तमीच्या दिवशी भाविक सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करतात. तांब्याच्या कलशात जल घेऊन त्यात लाल फुले, अक्षता आणि गूळ टाकून सूर्याला अर्घ्य दिले जाते. अर्घ्य अर्पण करताना 'ॐ सूर्याय नमः' या मंत्राचा जप करावा. तसेच या दिवशी सूर्य चालीसा आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. दिवसभर मीठ विरहित उपवास करून फलाहार करावा. अनेक ठिकाणी या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा आणि विशेष यज्ञ देखील आयोजित केले जातात.
