दोन शिफ्टमध्ये पुजारी
शनिमंदिरात 6 पुजारी 2 शिफ्टमध्ये अभिषेक करतील. पहाटे 4 ते रात्री 10.30 अशा दोन शिफ्टमध्ये हे पुजारी काम करतील. सर्व अधिकृत पुरोहित पुजाऱ्यांना कामाच्या वेळी मोबाइल वापरता येणार नाही, असा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
बाप्पाच्या निर्माल्यातून मिळणार वृक्षांना जीवनदान, ठाण्यात पर्यावरणपूरक उपक्रम
भाविकांसाठी दानपेटी
ज्या भाविकांना देवस्थानला दान द्यायचे आहे, त्यांच्यासाठी उदासी महाराज मठ आणि यज्ञमंडप येथे दानपेटी ठेवली जाणार आहे. शनिमंदिरात 1000 रुपयांहून अधिक रकमेपुढील मोठे देणगीदार व पंचक्रोशीतील भाविक यांच्याकडून अभिषेक देणगी स्वीकारली जाणार नाही, असेही विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.
advertisement
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरचा शनिदेव हे प्रसिद्ध देवस्थान आहे. याठिकाणी दरवर्षी लाखो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येत असतात.