TRENDING:

रुद्राक्ष धारण केल्यानंतर या गोष्टींची काळजी घ्या, सर्व संकटांपासून होईल रक्षण

Last Updated:

रुद्राक्ष धारण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कोणती काळजी घ्यावी.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 7 ऑगस्ट: हिंदू धर्मात रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानले जाते. रुद्राक्ष हा देवाधिदेव महादेवाशी संबंधित असल्यामुळे ते आपल्या आस्थेचे आणि श्रद्धेचे प्रतीकदेखील आहे. जिथे रुद्राक्ष धारण केल्याने भगवान शंकराची कृपा आणि सर्व संकटांपासून संरक्षण मिळते, तिथे पर्यायी उपचार पद्धतीतही रुद्राक्ष उपचार आजकाल खूप लोकप्रिय होत आहेत. म्हणूनच आपण जाणून घेऊया की, रुद्राक्ष धारण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कोणती काळजी घ्यावी.
News18
News18
advertisement

ऑगस्टमध्ये सूर्य-शुक्रासह हे ग्रह आपला मार्ग बदलणार, या राशींना होणार लाभ

रुद्राक्षाचे महत्त्व

रुद्राक्ष हे झाडाच्या फळाचे बीज आहे. रुद्राक्षाचे औषधी आणि आध्यात्मिक महत्त्वही आहे. हे धारण केल्याने जीवनात विशेष फळ मिळते. रुद्राक्ष अकाली मृत्यू आणि शत्रूच्या अडथळ्यांपासून रक्षण करतो असे मानले जाते. एकूण चौदा मुखी रुद्राक्ष आहेत. या चौदा रुद्राक्षांशिवाय गौरी शंकर आणि गणेश रुद्राक्षही आढळतात.

advertisement

रुद्राक्ष धारण करण्याची खबरदारी

लाल धागा किंवा पिवळ्या धाग्यात रुद्राक्ष धारण करा. यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी, अमावास्येला किंवा सोमवारी रुद्राक्ष धारण करणे उत्तम मानले जाते. या श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी रुद्राक्ष धारण करता येतो कारण श्रावणातील प्रत्येक दिवस शुभ मानला जातो. रुद्राक्ष 1, 27, 54 आणि 108 अंकात धारण करावा. रुद्राक्ष धारण केल्यानंतर सात्त्विकतेचे पालन करावे. धातूसह रुद्राक्ष धारण करणे अधिक चांगले आहे. रुद्राक्षाची माळ इतर कोणी धारण करू नये. तसेच झोपताना रुद्राक्ष काढावा.

advertisement

रुद्राक्षाचे प्रकार

1. एक मुखी रुद्राक्ष

हे शिवाचे रूप मानले जाते. सिंह राशीच्या लोकांसाठी एकमुखी अतिशय शुभ मानले जाते. कुंडलीत सूर्याशी संबंधित समस्या असल्यास एकमुखी रुद्राक्ष धारण करावा.

2. दोन मुखी रुद्राक्ष

हे अर्धनारीश्वर स्वरूप मानले जाते. कर्क राशीच्या लोकांसाठी हे खूप शुभ मानले जाते. वैवाहिक जीवनात समस्या असल्यास दोन मुखी रुद्राक्ष धारण करावे.

advertisement

3. तीन मुखी रुद्राक्ष

हा रुद्राक्ष अग्नि आणि तेजाचे रूप आहे. हा रुद्राक्ष मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उत्तम परिणाम देतो. या रुद्राक्षाचा उपयोग मंगल दोष निवारणासाठी केला जातो.

4. चार मुखी रुद्राक्ष

हा रुद्राक्ष ब्रह्मदेवाचे रूप मानला जातो. मिथुन आणि कन्या राशीसाठी हा सर्वोत्तम रुद्राक्ष आहे. त्वचेचे आजार आणि बोलण्याच्या समस्यांवर हे फायदेशीर आहे.

advertisement

5. पाच मुखी रुद्राक्ष

याला कालाग्नी असेही म्हणतात. हे धारण केल्याने शक्ती आणि अद्भुत ज्ञान प्राप्त होते. कोणाची राशी धनु किंवा मीन आहे किंवा कोणाच्या शिक्षणात अडथळे येत आहेत. अशा लोकांनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा.

6. सहा मुखी रुद्राक्ष

हे भगवान कार्तिकेयाचे रूप मानले जाते. कुंडलीत शुक्र कमजोर असेल किंवा तूळ किंवा वृषभ राशी असेल तर सहामुखी रुद्राक्ष धारण करावा.

Vastu Tips: हा जीव आपल्यासाठी किती शुभ आणि किती अशुभ

7. सात मुखी रुद्राक्ष

हे सप्तमातृका आणि सप्तऋषींचे स्वरूप मानले जाते. कठीण परिस्थितीत आणि गंभीर परिस्थितीत ते परिधान करा. मृत्यूसारखे त्रास होण्याची शक्यता असल्यास किंवा मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी सात मुखी रुद्राक्ष धारण करावे.

8. आठ मुखी रुद्राक्ष

हे आठ देवींचे रूप आहे. हे धारण केल्याने आठ सिद्धी प्राप्त होतात. हे धारण केल्याने अचानक धनप्राप्ती सहज होते, ज्यांच्या कुंडलीत राहूशी संबंधित समस्या आहेत. त्याने आठ मुखी रुद्राक्ष धारण करावे.

9. अकरा मुखी रुद्राक्ष

अकरा मुखी रुद्राक्ष हे स्वतः भगवान शंकराचे रूप मानले जाते. मुलाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि संतती प्राप्तीसाठी हा रुद्राक्ष धारण करणे आवश्यक आहे.

विशेष लाभासाठी रुद्राक्ष

लवकर लग्नासाठी दोन मुखी रुद्राक्ष किंवा गौरी शंकर रुद्राक्ष धारण करा. शिक्षण आणि एकाग्रतेसाठी पाच मुखी रुद्राक्ष धारण करा. आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी एक मुखी किंवा अकरा मुखी रुद्राक्ष धारण करा. नोकरीत अडथळे टाळण्यासाठी तीन मुखी रुद्राक्ष धारण करा. व्यसनमुक्तीसाठी पाच मुखी रुद्राक्ष धारण करा. भक्तीसाठी अकरा मुखी रुद्राक्ष धारण करा. रुद्राक्ष घासून तिलक लावल्याने तेज आणि सौंदर्य वाढते. तळवे आणि कपाळावर रुद्राक्षाची पेस्ट लावावी.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
रुद्राक्ष धारण केल्यानंतर या गोष्टींची काळजी घ्या, सर्व संकटांपासून होईल रक्षण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल