काय आहे आख्यायिका?
कल्याण स्थानक हे एक गजबजलेलं ठिकाण आहे. या ठिकाणी शीतला देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. या मंदिरात देवीची उपासना केली जाते. ही देवी स्वयंभू असून या मंदिरात कांजण्या, गोवर, खरूज यासारखे त्वचा रोग झाले असतील तर देवीचे अंघोळीचे पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकावे लागते त्यानंतर ते सर्व रोग बरे होतात अशी एक आख्यायिका आहे, अशी माहिती मंदिराच्या पूजारी काजल गुरव यांनी दिली.
advertisement
हनुमान आणि दुर्गामाता एकत्र, कसं आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर?
या देवीला दुपारी 12 वाजल्यानंतर घातली जाते अंघोळ
सर्वच देवळात देवांना सकाळी आंघोळ घालण्याची प्रथा आहे. त्यानंतर पूजा अर्चा होते. मात्र या देवीला दुपारी 12 वाजल्यानंतर अंघोळ घातली जाते. तोपर्यंत भाविक येऊन देवीला पाणी अर्पण करतात. त्यानंतर दुपारी 12 नंतर देवीला अंघोळ घातली जाते. मुखवटे लावले जातात अशी माहिती मंदिराचे गुरव काळे यांनी दिली.
कांजण्या आणि गोवर बरा होतो अशी ख्याती
गोवर, कांजण्या, खरूज झालेल्या रुग्णांना डॉक्टरांच्या औषधाबरोबरच शीतलादेवीच्या मंत्रोपचाराने पाणी दिले जाते. हे पाणी अंघोळीच्या वेळी पाण्यात टाकले तर आराम पडतो अशी ख्याती आहे. त्यामुळे अनेक जण कांजण्या, गोवर झाला तर रुग्णांना या मंदिरात घेऊन येतात, पूजारी काजल गुरव यांनी सांगितले.
विदर्भातील या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास, योगी आदित्यनाथांशी आहे खास कनेक्शन
शीळ सप्तमीला होतो कार्यक्रम
शीळ सप्तमीला या देवळात भाविक मोठी गर्दी करतात. या देवळात आदल्या दिवशी शिजवलेले अन्न नैवेद्य म्हणून अर्पण करतात अशी प्रथा आहे.
नवरात्रात नवमीला होतो यज्ञ
नवरात्रात नऊ दिवस घट बसवले जातात. नऊ दिवस मंदिरात प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. नऊव्या दिवशी नाव चंडीचा होम केला जातो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)