कुठं आहे हे शिवमंदिर?
पुणे शहर आणि जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेली ही मंदिरे अनेकांना माहिती नसतात. असेच एक मंदिर सिंहगड जवळील डावजे गावात आहे. स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. 1962 मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली. हे मंदिर डोंगरात असल्याने जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतर चालत वर जावे लागते. तरीही भाविकांची वर्दळ या ठिकाणी असते.
advertisement
पुणेकर तरुणांनी जागवला आग्र्याहून सुटकेचा थरार, महाराजांना दिली अनोखी मानवंदना
मंदिर निर्मितीची आख्यायिका
वनसंरक्षक व शिवभक्त शंकरराव सर्जे ऊर्फ सर्जेमामा हे निळकंठेश्वर मंदिराचे मुख्य विश्वस्त होते असं सांगितलं जातं. 1962 साली निळकंठेश्वराच्या डोंगरावर असलेल्या वनात वनरक्षक म्हणून ते काम करीत होते. एके दिवशी स्वतः भगवान शिवशंकरांनी त्यांना स्वप्नात येऊन मी व माझा नंदी सदर डोंगरावर एका विशिष्ट ठिकाणी जमिनीखाली गाडलो गेलो आहे. मला बाहेर काढ, असा दृष्टांत दिला. त्यानंतर सर्जेमामांनी त्वरीत सांगितलेल्या ठिकाणी खणून पाहिले असता त्यांना तेथे नंदी तसेच भगवान शिवशंकरांचे लिंग आढळले. त्यांनी त्याला बाहेर काढून त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. त्यामुळे याला स्वयंभू नीलकंठेश्वर म्हंटल जात, असं सेवेकरी दिनकर शिंदे यांनी सांगितलं.
अनेक लोकांना केलं व्यसनमुक्त
सर्जमामांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून अनेक समाजोपयोगी कामे केली. त्यांनी येथे दारु व्यसनमुक्ती अभियान सुरू केले. यातून सुमारे 2 लाख 56 हजार लोकांना दारुच्या व्यसनातून मुक्त केले, अशी माहिती मंदिराचे सेवेकरी शिंदे यांनी दिली.
POP विसरा! कागदाच्या लगद्यापासून तयार केले आकर्षक बाप्पा, मूर्ती पाहून बसणार नाही विश्वास
निसर्गरम्य मंदिर परिसर
नीलकंठेश्वर मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे मंदिर डोंगरात असल्यामुळे लोकांना 2 ते 3 किमी डोंगर चडून जावं लागत. पण या मंदिराचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य आहे. या डोंगरावरून पानशेत, खडकवासला धरण देखील पाहिला मिळतं. हे मंदिर सिहंगड रोडला असलेल्या डावजे या गावामध्ये आहे. तसेच इथले पुतळे हे मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे या मंदिराला अवश्य भेट देऊ शकता.