श्रीरामांनी केला होता विजया एकादशीचा उपवास - प्रभू श्रीरामांनी लंका विजयापूर्वी या विजया एकादशीचा उपवास करून संकल्प केला होता. अशी मान्यता आहे की, हा उपवास केल्याने भक्ताचे रोग आणि दुःख दूर होतात आणि शत्रूंचा पराभव होतो. विजया एकादशीचे व्रत केल्याने मोठे पुण्य मिळते आणि कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते.
advertisement
शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी भगवान विष्णूंचे मंत्र
श्री हरी विष्णूच्या या मंत्रांचा जप करणे फायदेशीर ठरते:
ॐ नमोः नारायणाय॥
ॐ नमोः भगवते वासुदेवाय॥
ॐ श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णुः प्रचोदयात्॥
तसेच, मङ्गलम् भगवान विष्णुः, मङ्गलम् गरुडध्वजः। मङ्गलम् पुण्डरी काक्षः, मङ्गलाय तनो हरिः॥ या मंत्राचाही जप करावा.
विजया एकादशीला काय दान करावे -
विजया एकादशीला गरीब किंवा गरजू लोकांना पिवळे कपडे दान करणे खूप शुभ असते. यामुळे संपत्तीत वाढ होते आणि जीवनातील समस्या कमी होतात.
विष्णूची कृपा मिळवण्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी या दिवशी तांदळाचे दान करावे. यामुळे पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळण्यास मदत होते.
महाशिवरात्रीला 300 वर्षांनी दुर्मीळ संयोग; भाग्यशाली 3 राशींवर अनपेक्षित धनवर्षा
जो भक्त विजया एकादशीला गाईच्या तुपाचे दान करतो, त्याला समाजात मान-सन्मान मिळतो. तसेच कुंडलीतील शुक्र आणि गुरू ग्रहांची स्थिती मजबूत होते.
या दिवशी श्रीमद्भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनाम यांसारख्या धार्मिक पुस्तकांचे दान केल्यास आयुष्यातील कठीण प्रसंग दूर होऊ शकतात.
जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी विजया एकादशीला तीळ आणि गुळाचे दान करावे. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि मानसिक शांती मिळते.
