advertisement

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला 300 वर्षांनी दुर्मीळ संयोग; या भाग्यशाली 3 राशींवर अनपेक्षित धनवर्षा

Last Updated:
Mahashivratri Horoscope 2026: मराठी पंचागानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील महाशिवरात्री 15 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. शंभू महादेवाच्या पूजेचा खास उत्सव यंदा अत्यंत खास असणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, महाशिवरात्रीला तब्बल 300 वर्षांनंतर एक दुर्मिळ योगायोग जुळून येत आहे. यावेळेस महाशिवरात्रीला एकाच वेळी 8 शुभ योग असतील.
1/6
या दिवशी सूर्य, बुध आणि शुक्र यांचा त्रिग्रही योग असेल. त्याशिवाय व्यतिपात योग, वरियान योग आणि ध्रुव योग देखील असेल. सूर्य-बुध कुंभ राशीत बुधादित्य राजयोग बनवतील, तर शुक्र-बुध लक्ष्मी नारायण राजयोग आणि सूर्य-शुक्र शुक्रादित्य राजयोग तयार करतील. विशेष म्हणजे महाशिवरात्री श्रवण नक्षत्रात येत आहे, ते महादेवाचे अत्यंत प्रिय नक्षत्र मानले जाते.

2/6
मेष - महाशिवरात्रीला होणारा हा दुर्मिळ संयोग मेष राशीच्या लोकांसाठी पैसा आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतो. करिअर आणि व्यवसायातील प्रगतीचा वेग वाढेल. तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मोठा दिलासा मिळणार आहे. कोणाकडे अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि उत्पन्नाचे नवीन स्रोतही तयार होऊ शकतात.

3/6
मेष राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांची पद-प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील आणि तुम्ही शत्रूंवर विजय मिळवाल. तुमच्या नियोजित रणनीती या काळात यशस्वी ठरू शकतात.

4/6
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी ही महाशिवरात्री नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जात आहे. नवीन व्यवसाय, दुकान किंवा फॅक्टरी सुरू करण्यासाठी ही वेळ खूप चांगली दिसत आहे. भगवान शिवाच्या कृपेने नवीन कामाचा श्रीगणेश होऊ शकतो. व्यापाराशी संबंधित लोकांना विस्ताराच्या आणि फायद्याच्या अनेक संधी मिळतील.

5/6
कन्या राशीच्या लोकांच्या बऱ्याच काळापासून रखडलेल्या योजना आता वेग घेतील. करिअरमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळतील आणि तुमच्या मनातील एखादी जुनी मोठी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे.

6/6
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीचा दिवस करिअरमध्ये मोठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. तुमच्या कल्पकतेच्या जोरावर तुम्ही मोठे स्थान गाठाल. कार्यक्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती आधीपेक्षा सुधारल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे खर्च कमी होतील आणि बचतीत वाढ होणे शक्य आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement