धन आणि धान्याची कधीच कमतरता भासणार नाही
जर तुम्हाला धान्याचा ड्रम ठेवायचा असेल, तर वायव्य दिशा म्हणजेच वायव्य कोन त्यासाठी योग्य राहील. यासोबतच तुम्ही मसाले, डाळी, तांदूळ यांसारख्या सर्व धान्यांची साठवणूक याच दिशेला करू शकता. या दिशेला धान्य, मसाले, डाळी इत्यादी ठेवल्याने धन आणि धान्याची कधीच कमतरता भासणार नाही.
कुटुंबात राहील सुख-शांती
advertisement
घरातील कचरापेटी खूप महत्त्वाची असते आणि म्हणून ती नेहमी घराच्या नैऋत्य किंवा वायव्य दिशेला ठेवावी. या दिशेला कचरापेटी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, पण लक्षात ठेवा की कचरापेटी घराबाहेर नसावी, ती आतमध्येच ठेवा. असे केल्याने कुटुंबात सुख-शांती राहते आणि घराच्या प्रमुखाचे आरोग्यही चांगले राहते.
लक्ष्मी देवीची राहील कृपा
घराच्या ईशान्य दिशेला पाण्याची टाकी ठेवणे नेहमीच चांगले मानले जाते. जर ही दिशा शक्य नसेल तर उत्तर दिशेला पाण्याची टाकी ठेवणे अधिक चांगले राहील. या दिशेला पाण्याची टाकी ठेवल्याने लक्ष्मी देवीची कृपा राहील आणि संपत्तीत वाढ होईल. दुसरीकडे, जर तुम्ही भूमिगत टाकी बनवत असाल तर ती ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात ठेवणे चांगले राहील.
पती-पत्नीचे नाते होईल अधिक घट्ट
जर तुम्हाला अन्नपदार्थ जास्त काळासाठी साठवून ठेवायचे असतील, तर ते नैऋत्य दिशेला ठेवा. ही दिशा अन्नपदार्थ साठवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार ड्रेसिंग टेबल ठेवण्यासाठीही जागा निश्चित आहे. यासाठी तुम्ही ड्रेसिंग टेबल घराच्या उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवू शकता. असे केल्याने पती-पत्नीच्या संबंधात अधिक घट्टपणा येईल.
हे ही वाचा : जीवन समस्यांनी ग्रस्त झालंय? तर 'हे' जल घ्या, तणाव अन् चिंता होईल दूर; जल कसं आणि कधी घ्यावं?
हे ही वाचा : भुकंपापासून घर वाचवायचं असेल, तर फाॅलो करा 'हे' वास्तुनियम; घरासहीत कुटुंबही राहील सुरक्षित!
