देहरादून, 2 ऑक्टोबर : पितृपक्ष सुरू झाला आहे. हिंदू धर्मात पितृपक्षाचं विशेष महत्त्व आहे. या काळात पितरांना प्रसन्न करण्यासाठी विविध विधी केल्या जातात. ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यातील सर्व अडचणी हळूहळू दूर होतात. मात्र या काळात काही पथ्यदेखील पाळावी लागतात.
पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून होते. जी अश्विन मासाच्या अमावस्येपर्यंत असते. यामध्ये पिंडदान, ब्राह्मण भोजन, इत्यादींसारखे कार्य पार पाडले जातात. मात्र या काळात कोणतंही शुभकार्य केलं जात नाही. कारण पितृपक्षात केलेली सर्व शुभकार्य निष्फळ ठरतात, असं मानलं जातं.
advertisement
एकाच ठिकाणी घ्या 50पेक्षा जास्त मोमोजचा आस्वाद
महत्त्वाचं म्हणजे पितृपक्षात पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध विधी केल्या जात असल्या तरी या काळात आपण असे काही पदार्थ खातो ज्यामुळे पितरं नाराजही होऊ शकतात. त्यामुळे पाहूया खाद्यपदार्थांबाबत नेमकी कोणती पथ्ये पाळावी? दरम्यान, 29 सप्टेंबरपासून सुरू झालेला पितृपक्ष 14 ऑक्टोबर रोजी समाप्त होणार आहे.
पितृपक्षात भोजन देण्याची आहे प्रथा, मात्र 'या' गावात येत नाही एकही कावळा
1. या काळात लसूण, कांद्याचं सेवन करणं वर्ज्य मानलं जातं.
2. चणे आणि सत्तूच्या पिठापासून बनवलेली मिठाई या काळात खाल्ली जात नाही.
3. मसूर डाळसुद्धा पितृपक्षात खाऊ नये.
4. या काळात मांसाहार करू नये.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)