जालना : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जालना जिल्ह्यातील मत्स्योदरी देवी संस्थान येथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. लक्ष लक्ष दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला. मागील 20 वर्षांपासून दीपोत्सव साजरा करण्याची मत्स्योदरी देवी संस्थानाची ही परंपरा 21 व्या वर्षीही कायम राहिली. अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक आरती झाल्यानंतर हा कार्यक्रम संपन्न झाला.
advertisement
त्रिपुरारी पौर्णिमेचं हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रत्येक घरी या दिवशी दिवा लावण्याची देखील परंपरा आहे. 21 वर्षांपूर्वी मच्छोदरी देवी संस्थान इथेही परंपरा कशी सुरू झाली याविषयी अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी माहिती दिलीये.
अंबड शहरातील काही नव तरुणांच्या संकल्पनेतून 21 वर्षांपूर्वी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. ती आजतागायत पर्यंत सुरू आहे. यंदा देखील तब्बल 11 हजार दिवे प्रज्वलित करून हा भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. अंबड शहरातील नागरिक मोठ्या उत्साहाने या सोहळ्यामध्ये सहभागी झाले. हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी मागील चार वर्षांपासून फ्रान्स येथील काही पर्यटक देखील येत आहेत. भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हाव या उद्देशाने हा दीपोत्सव साजरा करण्यात येत असल्याचं अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितलं.
हजारो दिव्यांनी उजळला पुण्यातील चतुर्श्रुंगी मंदिर परिसर, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा
आम्ही फ्रान्स येथून आलो आहोत. माझं नाव विल्सन आहे. मागील चार वर्षांपासून मी या मंदिरातील दीपोत्सव अनुभवण्यासाठी येत असतो. हा अनुभव अतिशय वेगळा आहे. यावर्षी देखील मी या उत्सवासाठी उपस्थित राहू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. अशा करूया पुढील वर्षी देखील आम्ही या सोहळ्यासाठी उपस्थित राहू अशा भावना फ्रान्स येथील पर्यटन विल्सन यांनी व्यक्त केली आहे.
मत्स्योदरी देवी संस्थान हे जालना जिल्ह्यातील एक महत्त्वाचे देवस्थान आहे. नवरात्र उत्सवामध्ये इथे मोठी यात्रा भरते. केवळ जालना जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून येथे देवीच्या दर्शनासाठी भाविक येतात. नवरात्र उत्सवामध्ये नवस पूर्ण झालेली जोडपे इथे प्रत्येक पायरीवर नारळ फोडतात तसेच नवसाची झालेली बाळ झोळीत झेलण्याची देखील परंपरा येथे शेकडो वर्षांपासून सुरू आहे.





