TRENDING:

शिरखेडच्या नानागुरू महाराज पुण्यतिथी उत्सवात भक्तांची अनोखी श्रद्धा; 500 मीटरपर्यंत घालतात लोटांगण

Last Updated:

अमरावती मधील मोर्शी तालुक्यातील शिरखेड येथे नाना गुरू महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा पार पडला. गेले अनेक वर्षापासून चालत आलेली तेथील एक परंपरा आहे. त्याला लोटांगण असे म्हणतात. त्याबाबत जाणून घेऊ

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी - प्रतिनिधी
advertisement

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात शिरखेड येथे नानागुरू महाराजांचा पुण्यतिथी उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा केला जातो. संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेल्या या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे लोटांगण ही अनोखी परंपरा. यंदाही या परंपरेचे पालन करत भक्तांनी उत्साहात हा सोहळा साजरा केला.

लोटांगण म्हणजे काय?

लोटांगण ही परंपरा श्रद्धेने ओथंबलेली आहे. या प्रथेअंतर्गत नानागुरू महाराजांच्या पालखीसमोर भक्त जमिनीवर लोळण घेत करत महाराजांप्रती श्रद्धा व्यक्त करतात. दरवर्षी या सोहळ्यात हजारो लोक सहभागी होतात. नानागुरू महाराज संस्थानचे अध्यक्ष सुधाकर गोमकाळे आणि कार्यकर्ता निलेश तट्टे यांनी ही परंपरा उलगडून सांगितली.

advertisement

गणपतीचे मंदिर आणि नानागुरू महाराज

शिरखेडमधील हे मंदिर गणपतीचे असून, नानागुरू महाराज हे गणेश उपासक होते. त्यांनी स्वतः गणपतीची मूर्ती तयार करून स्थापन केली. मंदिर परिसरात दोन मोठे सोहळे होतात - गणपती विसर्जन आणि नानागुरू महाराज पुण्यतिथी. या उत्सवांमध्ये 15 लाखांहून अधिक भक्त सहभागी होतात. खास करून या ठिकाणचा महाप्रसाद, ज्यामध्ये कोहळ्याची भाजी आणि कण्या, सर्वात जास्त लोकप्रिय आहे.

advertisement

लोटांगण परंपरेचा प्रवास

पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी महाराजांची पालखी गावातून फिरते. भक्त आपल्या श्रद्धेने लोळण घेत 500 मीटरचे अंतर पार करतात, ज्यामध्ये मंदिर ते काशी नदीचा समावेश असतो. या परंपरेत 5 वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यंतचे पुरुष सहभागी होतात. महिलांचा मात्र अद्याप सहभाग नाही.

इंग्रजांनी भेट दिलेले मंदिर

निलेश तट्टे सांगतात की, हे मंदिर संत तुकाराम महाराजांच्या काळातील आहे आणि जवळपास 400 वर्षांपूर्वीचे आहे. विशेष म्हणजे इंग्रजांनीही या मंदिराला भेट देऊन महाराजांचे दर्शन घेतले होते. मंदिराच्या स्थापनेबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, पण 1964 मध्ये त्याचा जीर्णोद्धार झाल्याचे नोंद आहे.

advertisement

लोटांगण परंपरा का खास आहे?

लोटांगण ही केवळ परंपरा नसून श्रद्धेची गाथा आहे. भक्तांमध्ये महाराजांप्रती असलेल्या निस्सीम भक्तीचा तो प्रत्यय आहे. दरवर्षी नवीन भक्तही यामध्ये सहभागी होतात, ज्यामुळे ही परंपरा वर्षागणिक समृद्ध होत आहे.

मराठी बातम्या/अध्यात्म/
शिरखेडच्या नानागुरू महाराज पुण्यतिथी उत्सवात भक्तांची अनोखी श्रद्धा; 500 मीटरपर्यंत घालतात लोटांगण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल