TRENDING:

Shani Pradosh 14 February 2026: 'व्हॅलेंटाईन डे' आणि शनि प्रदोषाचा अनोखा संयोग; लवकर शुभमंगल करायचं असल्यास पार्टनरलासोबत घेऊन..

Last Updated:

Shani Pradosh 14 February 2026: पंचांगानुसार, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 04:01 वाजता सुरू होईल आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 05:04 वाजता संपेल. प्रदोष व्रत 15 फेब्रुवारीला पाळले जाईल. या दिवशी महादेवाची पूजा..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रत्येक महिन्यात 2 वेळा त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. 2026 मध्ये माघ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत 15 फेब्रुवारीला असेल. त्रयोदशी तिथीची सुरुवात 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे होत असून त्या दिवशी शनिवार असल्याने, हा शनि प्रदोष योग शिव आणि शनिदेव दोघांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत खास आहे. विशेषतः विवाह इच्छूक जोडप्यांसाठी आणि मनपसंद जोडीदार शोधणाऱ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.
News18
News18
advertisement

शनि प्रदोष व्रत 2026: तिथी आणि वेळ

पंचांगानुसार, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 04:01 वाजता सुरू होईल आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 05:04 वाजता संपेल. प्रदोष व्रत 15 फेब्रुवारीला पाळले जाईल. या दिवशी महादेवाची पूजा करण्यासाठी संध्याकाळी 06:01 ते रात्री 08:32 या प्रदोष काळातील वेळ सर्वात शुभ असेल.

advertisement

विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी उपाय - लग्नासाठी योग्य स्थळ मिळत नसेल किंवा विवाहाच्या कार्यात वारंवार अडचणी येत असतील, तर या दिवशी काही प्रभावी उपाय केले जाऊ शकतात. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी 108 बेलपत्र घेऊन त्यावर चंदनाने 'श्री राम' लिहावे आणि एक-एक करून ते शिवलिंगावर अर्पण करावे. जर प्रेमविवाहात अडचणी येत असतील, तर दोन्ही जोडीदारांनी हा उपाय करणे विशेष फलदायी मानले जाते.

advertisement

सुखी वैवाहिक जीवनासाठी या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा करून शिव चालीसा वाचावी. मनपसंद जोडीदार मिळावा अशी इच्छा असल्यास प्रदोष व्रत करून संध्याकाळी शिव मंदिरात तुपाचा दिवा लावावा. याशिवाय, ज्यांना शनीची साडेसाती किंवा अडीचकी सुरू आहे, त्यांनी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलात काळे तीळ टाकून दिवा लावावा. यामुळे शनीचा दोष शांत होऊन जीवनातील संकटे दूर होतात.

advertisement

शनि प्रदोषाची पूजा साहित्य - भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती किंवा फोटो, पिंडीवर अभिषेक करण्यासाठी शुद्ध पाणी, दूध, दही, तूप, मध आणि साखर (पंचामृत), पूजेसाठी पांढरे चंदन, अक्षता (अखंड तांदूळ), भस्म आणि अष्टगंध, शंकराचे प्रिय बेलपत्र (किमान 11 किंवा शक्य असल्यास 108), धोत्र्याची फुले, पांढरी फुले, शमीची पाने आणि काळे तीळ (शनि प्रदोषासाठी विशेष), तसेच नैवेद्यासाठी फळे, मिठाई किंवा घरी बनवलेली खीर, आरतीसाठी तूप किंवा तेलाचा दिवा, कापूर आणि धूप, शेवटी भगवान शिवांना अर्पण करण्यासाठी जानवे आणि माता पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार (हळद-कुंकू इत्यादी).

advertisement

पूर्वमुखी घर का सर्वात शुभ? पण 'वास्तु'चे हे नियम 90% लोक दुर्लक्षित करून चुकतात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मानव संस्कृतीचे दुर्मिळ पुरावे, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात अनोखा ठेवा
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Shani Pradosh 14 February 2026: 'व्हॅलेंटाईन डे' आणि शनि प्रदोषाचा अनोखा संयोग; लवकर शुभमंगल करायचं असल्यास पार्टनरलासोबत घेऊन..
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल