पाकिटात देवाचा फोटो का ठेवू नये?
अशुद्धता आणि अनादर
वास्तू शास्त्रानुसार, पाकीट आपण अनेकदा अस्वच्छ हातांनी स्पर्श करतो. कधी ते पँटच्या मागच्या खिशात ठेवले जाते, तर कधी अशुद्ध ठिकाणी ठेवले जाते. देवाचे स्थान हे अत्यंत पवित्र आणि पूजनीय असते. अशा अशुद्ध ठिकाणी देवाचा फोटो ठेवणे हा देवाचा अपमान मानला जातो, ज्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते.
advertisement
आर्थिक अडथळे
पाकिटात देवाचा फोटो ठेवल्याने कर्जाचा बोजा वाढू शकतो, अशी मान्यता आहे. देवाच्या चित्रावर सतत मानवी स्पर्श किंवा घाम लागल्याने त्यातील सकारात्मकता संपते आणि व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. याचप्रमाणे जर तुम्ही तुमचं पाकीट सतत काढून कोणत्या ठिकाणी ठेवत असाल तर त्याचा आपल्या आयुष्यावर देखील नकारात्मक परिणाम होतो.
अस्थिरता
पाकीट हे चलनासाठी असते. लक्ष्मीचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या पैशांसोबत देवाचा फोटो ठेवल्याने मनात सात्त्विक विचारांऐवजी गोंधळ निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे निर्णयक्षमता कमकुवत होते. देवी लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते, अशा परिस्थिती जर तुम्हीही तुमच्या पाकिटात कोणत्या देवांचे फोटो ठेवत असाल तर ते नकारात्मक ठरू शकते.
आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी पर्समध्ये काय ठेवावे?
जर तुम्हाला तुमच्या पर्समध्ये सकारात्मक ऊर्जा आणि पैशांचा प्रवाह स्थिर ठेवायचा असेल, तर वास्तुशास्त्रानुसार काही शुभ वस्तू ठेवता येतील. मोराचे पंख शुभ आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जातात, तर तांदूळ समृद्धी आणि समाधानाचे प्रतीक आहे. देवी लक्ष्मीचे प्रतीक असलेले श्रीयंत्र तुमच्या पर्समध्ये ठेवल्यास संपत्ती वाढवते असे मानले जाते. हळदीचा एक गोळा गुरु आणि समृद्धीशी संबंधित आहे, म्हणून ते ठेवणे देखील शुभ मानले जाते. या सर्व वस्तू स्वच्छ कापडात किंवा कागदात गुंडाळून पर्समध्ये ठेवाव्यात.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
