TRENDING:

फक्त स्वप्नांमुळेच नाही, वास्तूदोषामुळे उडते झोप, बेडवर बसून कधीही करू नये 'ही' चूक!

Last Updated:

Vastu Tips: प्रसिद्ध ज्योतिषांनी सांगितलं की, उत्तम झोप लागत नसेल तर आपल्या झोपण्याचं ठिकाण व्यवस्थित तपासावं. कारण त्या खोलीत जर वास्तूदोष असेल तर झोपेसंबंधी अडथळे निर्माण होऊ शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
परमजीत कुमार, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

देवघर : पूर्ण झोप आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. रात्रीची झोप व्यवस्थित झाली, तरच शरीर दिवसभर ऊर्जावान राहू शकतं. परंतु आजकालचं जीवन एवढं धावपळीचं झालंय की, मानसिक तणावामुळे रात्री शांत झोप लागत नाही. काहीजणांना रात्रभर अस्वस्थ वाटतं, वाईट स्वप्न पडले की झोप उडते, गाढ झोप लागतच नाही. यामागे चिंता, कामाचा वाढता व्याप ही कारणं असूच शकतात, परंतु ज्योतिषशास्त्र सांगतं की, आपल्या खोलीची रचनाही याला कारणीभूत असू शकते.

advertisement

प्रसिद्ध ज्योतिषांनी सांगितलं की, उत्तम झोप लागत नसेल तर आपल्या झोपण्याचं ठिकाण व्यवस्थित तपासावं. कारण त्या खोलीत जर वास्तूदोष असेल तर झोपेसंबंधी अडथळे निर्माण होऊ शकतात.

झोप पूर्ण न होणं, निद्रानाश होणं यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अपूर्ण झोपेचा शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतो. काहीवेळा झोप न येणं हे वास्तूदोषामुळे होऊ शकतं. मग अशावेळी नेमकं काय करावं, जाणून घेऊया.

advertisement

जर आपल्या रूममध्ये आरसा असेल आणि त्याची सावली थेट आपल्या बेडवर किंवा अंथरुणावर पडत असेल तर तो तिथून काढून टाकावा. कारण यामुळे झोप अपूर्ण राहते. अंथरुणावर पडल्यावर मन अस्वस्थ राहतं.

बेड कायम योग्य दिशेतच असायला हवं. झोपल्यावर आपलं डोकं पश्चिम किंवा उत्तर दिशेत असेल अशा स्थितीत कधीच बेड ठेवू नये. तर, झोपल्यानंतर आपलं डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेला असायला हवं आणि पाय उत्तर किंवा पश्चिम दिशेला असायला हवे.

advertisement

ज्योतिषांनी सांगितलं की, बेडवर किंवा अंथरुणावर बसून चुकूनही कधीच जेवू नये. याचा अत्यंत नकारात्मक प्रभाव आयुष्यावर पडतो. त्यामुळे प्रामुख्यानं झोप पूर्ण होत नाही आणि विविध अडचणींचा सामना करावा लागतो. बेड कधीच भिंतीला चिकटून ठेवू नये. कारण यामुळे झोपेशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. देवघरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

मराठी बातम्या/अध्यात्म/
फक्त स्वप्नांमुळेच नाही, वास्तूदोषामुळे उडते झोप, बेडवर बसून कधीही करू नये 'ही' चूक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल