अयोध्या : हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक वर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला देवशयनी एकादशीचा सण साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी क्षीर सागरात भगवान श्री हरि विष्णु शयन करण्यासाठी जातात. या दिवशी या जगाचे पालनहार भगवान श्री हरी विष्णु 4 महिन्यांसाठी शयनकालमध्ये राहतात.
यानंतर या सृष्टीची देखभाल भगवान शंकर करतात. म्हणून भगवान विष्णुच्या शयनकाल पासून ते जागण्यापर्यंतच्या काळाला चातुर्मास या नावाने ओळखले जाते. धार्मिक दृष्टिीने ही वेळ भगवान श्री हरी विष्णुच्या पूजेची आहे. मात्र, यासोबतच या कालावधी दरम्यान, कोणत्याही प्रकारचे शुभ किंवा मंगल कार्यही निषिद्ध मानले जाते. म्हणून, यावर्षी चातुर्मास कधी सुरू होत आहे, तसेच तुम्हाला नेमक्या कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे, याबाबत जाणून घेऊयात.
advertisement
शनिदेवाला या 5 वस्तू खूपच आवडतात, साडेसातीमधून होईल नक्की सुटका, फक्त इतकं काम करा
अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, या वर्षी चातुर्मासाची सुरुवात 17 जुलैपासून होत आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या कार्तिकी एकादशीला म्हणजे 12 नोव्हेंबर रोजी हा चातुर्मास संपेल. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी मंगळवार, 16 जुलै रोजी रात्री 8.33 वाजेपासून ते बुधवारी 17 जुलै रोजी रात्री 9.02 वाजता समाप्त होईल.
चातुर्मासात या 5 गोष्टी करू नका -
⦁ चातुर्मासात चुकूनही मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण अशा तामसिक अन्नाचे सेवन करू नये.
⦁ चातुर्मास दरम्यान, मोठी यात्रा करण्यापासूनही वाचावे.
⦁ या दरम्यान, दारू आणि कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ सेवन करू नये.
⦁ चातुर्मास दरम्यान, कोणतेही शुभ किंवा मंगलकार्य करू नये.
⦁ या दरम्यान, कोणासोबत हिंचाचार किंवा कोणत्याही प्रकारचा अत्याचार करू नये. सर्वांतसोबत प्रेमाने राहावे, असेही त्यांनी सांगितले.