काशीचे ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय यांनी सांगितलं की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी स्थिर लग्नात सोने, जमीन, फ्लॅट किंवा वाहन खरेदी करणं खूप शुभ असतं. ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ लग्न ही स्थिर लग्न मानली जातात. हिंदू पंचांगानुसार, 30 एप्रिल रोजी सोने खरेदीसाठी तीन शुभ मुहूर्त सर्वोत्तम आहेत.
हे तीन मुहूर्त कधी आहेत?
advertisement
या दिवशी पहिला मुहूर्त सकाळी 6:18 ते 8:20 पर्यंत आहे. या वेळेत वृषभ लग्न आहे. दुसरा आणि सर्वोत्तम मुहूर्त दुपारी 12:46 ते 3 वाजेपर्यंत आहे. या वेळेत सिंह लग्नासोबत शोभन योग आहे. तिसरा आणि शेवटचा मुहूर्त सायंकाळी 7 ते रात्री 9:46 पर्यंत असेल.
वैदिक पंचांगानुसार, या वेळी अक्षय्य तृतीयेचा महान सण 30 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगासोबत शोभन योगाचाही शुभ संयोग आहे. यासोबतच या दिवशी रवि योग देखील आहे, जो रात्रभर असणार आहे.
विना मुहूर्ताचा विवाह दिवस
अशी धार्मिक मान्यता आहे की, अक्षय्य तृतीयेला केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय्य फळ देणारे ठरते. त्यामुळे या दिवशी विवाह, मुंडन, अन्नप्राशन इत्यादी सर्व शुभ कार्य विना मुहूर्ताचे केले जातात.
हे ही वाचा : अक्षय्य तृतीयेला 'या' राशीच्या लोकांनी खरेदी करावं सोनं; लक्ष्मी होईल प्रसन्न अन् कुबेर देतील आशीर्वाद
हे ही वाचा : वैशाख पौर्णिमेला आवर्जुन करा 'हे' उपाय; धनलक्ष्मी होईल प्रसन्न, कधीच रिकामी होणार नाही तिजोरी