जमुई : प्रत्येक दिवशी लोक आपल्या घरी देवाची पूजा अर्चना करतात. या दरम्यान, देवाला नैवेद्यही दिला जातो. अशी मान्यता आहे की, देवाला दाखवलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून ग्रहण करतात. मात्र, अशा वेळी नैवेद्य दाखवताना एखादी छोटीशी चूक केल्यानेही देव तुमच्यावर कोपू शकतो. त्यामुळे जी पूजा करुन तुम्हाला फळप्राप्तीची आशा आहे, ती केल्याने तुमच्यासाठी नुकसानदायी ठरू शकते. म्हणून ही चूक कोणती आहे, देवाला नैवेद्य दाखवताना काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात.
advertisement
ज्योतिषाचार्य पंडित शत्रुघ्न झा यांनी याबाबत लोकल18 शी बोलताना माहिती दिली. पूजा करताना ही छोटीशी चूक झाली तर पूजेचे फळ मिळण्याऐवजी तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते. ज्योतिषाचार्य शत्रुघ्न झा यांनी सांगितले की, पूजा करताना चुकूनही लोकांनी ही चूक करू नये. अनेकदा लोक असे करतात की ते देवासाठी तयार केलेले अन्नातूनच लोक देवाला अर्पण करण्यापूर्वी खाण्यास सुरुवात करतात आणि नंतर ते देवाला प्रसाद म्हणून अर्पण करतात. असे करणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे.
देवासाठी तयार केलेल्या अन्नातून वेगळे अन्न काढून ते खाल्ल्याने ते अन्न उष्टे होते आणि तेच अन्न जर देवाला अर्पण केले तर देव तुमच्यावर कोपू शकतो. त्यांनी सांगितले की, यासाठी सर्वात योग्य पद्धत म्हणजे, जर तुम्ही देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी कुणाला खायला देत असाल तर त्याआधी तयार केलेले भोजन आधी एका ताटात काढायला हवे. त्यानंतर तुम्ही ते खाऊ शकतात. असे केल्याने अन्न उष्ट होत नाही. तसेच देवाला उष्टे अन्न नैवेद्य स्वरुपात अर्पण करणे शास्त्रात अशुभ मानले गेले आहे.
या गोष्टींचीही घ्या काळजी -
ज्योतिषाचार्य म्हणाले की, नैवेद्य अर्पण करताना इतर अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात. देवाला अर्पण करताना तामसिक पदार्थांचा समावेश करू नये. तुम्ही लसूण, कांदा इत्यादी खाऊ शकता. मात्र, या गोष्टी देवाला नैवेद्य अर्पण करताना वापरू नयेत. त्यांना स्वच्छ व शुद्ध अन्न अर्पण करावे, अशी माहिती त्यांनी दिली.