सागर : “एक लोटा जल हर समस्या का हल” हा उपाय सांगणारे कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा हे सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावरही त्यांची वक्तव्ये, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पंडित प्रदीप मिश्रा हे शिव महापुराणाची कथा सांगतात. त्यांच्या कथेत लाखो भाविकांची उपस्थिती असते. कथेसोबतच ते लहान लहान उपाय सांगतात. हे उपाय लोकांना खूपच आवडतात. तसेच त्यांच्या वतीने रुद्राक्ष वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या रुद्राक्षात भाविकांची अतूट अशी श्रद्धा आहे.
advertisement
मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रामेश्वर मिश्रा यांच्या घरी 27 सप्टेंबर 1980 रोजी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्यांची आई माता सीता देवी मिश्रा यांनी आपल्या मुलाचे नाव रघु असे ठेवले. त्यामुळे प्रेमाने सर्व जण त्यांना याच नावाने बोलवू लागले. त्यांचे आई वडील जास्त शिकलेले नव्हते. आधी ते हरबऱ्याची गाडी लावायचे. नंतर त्यांनी चहाचे दुकान सुरू केले. तोपर्यंत रघू हे नाव बदलून प्रदीप झाले होते. प्रदीप आता शाळेत जाऊ लागले. तसेच कधीकधी आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी चहाच्या हॉटेलवरही जाऊ लागले.
त्यांनी सीहोर येथून शालेय आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. शालेय कालावधी दरम्यानच त्यांची धर्म-अध्यात्म याकडे आवड निर्माण झाली होती. या कारणामुळेच ते शाळेतही भजन गायचे. किर्तन करायचे. पदवीच्या शिक्षणादरम्यान, त्यांनी धर्मशास्त्राचा खोल अभ्यास केला.
यांच्याकडून घेतली दीक्षा -
सीहोर वाले बाबा या नावाने प्रसिद्ध असलेले पंडित प्रदीप मिश्रा यांना त्यांच्या परिचयाची ब्राह्मण कुटुंबातील एक महिला गीताबाई पाराशर यांनी गुरू दीक्षेसाठी इंदूर येथे पाठवले. याठिकाणी पंडित प्रदीप मिश्रा यांनी विठलेश राय काका यांना आपले गुरू मानले. प्रदीप मिश्रा यांनी दीक्षा घेऊन शिव मंदिरातून कथावाचन सुरू केले. त्यांनी आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा कथा केली. शिव महापुराण कथेबाबत त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्येही नोंद केली आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स आहेत.
अंगारकी चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, पाहा VIDEO
कुंडेश्वर धामप्रति भाविकांच्या मनात मोठी आस्था -
सीहोर जिल्ह्यात पंडित प्रदीप मिश्रा यांनी कुंडेश्वर धाम तयार केला. याठिकाणी देशभरातून भाविक येतात. इतकेच नव्हे तर परदेशातूनही लोक याठिकाणी येतात आणि रुद्राक्ष घेतात. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कुंडेश्वर धाम याठिकाणी मिळणाऱ्या रुद्राक्षबाबत भाविकांच्या मनात मोठी श्रद्धा आहे. कुंडेश्वर धामचे दर्शन करण्यासाठी लाखों भाविक भक्त याठिकाणी कायम येत असतात. पंडित प्रदीप मिश्रा यांना विनय मिश्रा आणि दीपक मिश्रा असे दोन भाऊ आहेत. तर त्यांची पत्नी गृहिणी आहे. तसेच त्यांना राघव आणि माधव अशी दोन मुले आहेत. त्यांच्या कथेला अनेक मंत्रीही हजेरी लावतात.