जेवताना का बोलू नये?
जेवताना न बोलण्यामागे अनेक कारणे आहेत. जेव्हा आपण जेवत असतो तेव्हा आपल्या तोंडातील लाळ अन्नात मिसळते, ज्यामुळे अन्न पचनास मदत होते. पण, जेव्हा आपण जेवताना बोलतो तेव्हा अन्नासोबत हवा देखील आपल्या पोटात जाते. यामुळे आपली पचनक्रिया विस्कळीत होते. म्हणूनच असे म्हणतात की, तोंड बंद करून अन्न चावून खावे. याशिवाय, आपल्याला माहीत आहे की, आपल्या शरीरात श्वास घेण्यासाठी आणि अन्न पोटात नेण्यासाठी दोन वेगवेगळ्या नळ्या असतात. श्वासनलिकेद्वारे हवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचते. त्याच वेळी, दुसरी नलिका पोटाशी जोडलेली असते, ज्याद्वारे अन्न पोटात पोहोचते.
advertisement
अन्न अडकण्याचा धोका
जेवताना पोटाची नलिका उघडते. याच नलिकेतून आपले अन्न पोटात जाते. दरम्यान, जेव्हा आपण बोललो तर श्वासनलिका देखील उघडते. यामुळे श्वासनलिकेत अन्न अडकण्याचा धोका असतो. जर अन्नाचा एखादा तुकडा श्वासनलिकेत अडकला तर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यामुळे मृत्यूचाही धोका असतो. त्यामुळे जेवताना बोलू नये.
सनातन धर्मात अन्नाला देवता मानले जाते. प्रचलित मान्यतेनुसार, जेवताना बोलल्यास अन्नाची देवता अपमानित होते. ती तुमच्यावर कोपू शकते. त्यामुळे जेव्हाही जेवण करा, तेव्हा न बोलता जेवण करा.
हे ही वाचा : शाळेत मागे असणारेसुद्धा नंतर चमकतात! तळहातावर या 2 ठिकाणी उंचवटे असणं लकी
हे ही वाचा : घरात लावा 'हे' झाड, घरातील सततचे कलह संपतील, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता