नर्मदापुरम : जर तुमच्या घरात वास्तूदोष असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणकारांच्या मते, वास्तुदोषांमुळे कुटुंबातील सदस्यांचे खराब आरोग्य, करिअरमध्ये समस्या, धनहानी, व्यवसायात अपयश अशा समस्या उद्भवतात.
अनेकांना मेहनत करूनही यश मिळत नाही. याशिवाय नेहमीच गृहकलहाची परिस्थिती असते. याचे मुख्य कारण म्हणजे घरातील वास्तू. त्यामुळे ज्योतिषाचार्य पं. पंकज पाठक यांनी असे सांगितले की, अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांनी कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता घरातील वास्तुदोष दूर करता येतात.
advertisement
चार सोप्या उपायांनी दूर होतील वास्तू दोष -
1. ईशान्य कोपऱ्यात लावा हा फोटो -
ज्योतिषाने सांगितले की, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचा ईशान्य कोपरा, ज्याला ईशान कोन असेही म्हणतात, त्याला सक्रिय करायला हवे. त्यासाठी या दिशेने उडणाऱ्या पक्ष्यांची छायाचित्रे, वाहणाऱ्या नदीचे किंवा उगवत्या सूर्याचे फोटो टाकू शकता. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
2. किचनमध्ये लावा लाल लाईट -
घरातील किचन वास्तूनुसार चुकीच्या ठिकाणी बांधले असेल, तर स्वयंपाकघरातील अग्नि कोणात लाल बल्ब लावू शकता. तसेच, दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्याला लावावा. असे केल्यास किचनमधील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख-समृद्धीही येते.
3. शनि यंत्राची स्थापना -
वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला वास्तुदोष असेल तर त्यासाठी या दिशेला शनियंत्राची स्थापना करावी. असे केल्यास कोणत्याही शुभ कार्यात अडथळा येणार नाही.
तुमच्या वस्तूला चुकूनही हात लावू शकणार नाही चोर, सायकल चोरी थांबवण्यासाठी एक दमदार idea
4. गणेशाची मूर्ती किंवा मनी प्लांट लावावा -
ज्योतिषाच्या मते, घराच्या अग्निकोनात वास्तुदोष असेल तर या दिशेला गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावावा. याशिवाय मनी प्लांटही या दिशेला लावता येतो. असे केल्याने घरात कधीही धन-समृद्धीची कमतरता राहत नाही. कुटुंबात प्रेमाची भावना निर्माण होते. नोकरी आणि व्यवसायातही तुम्हाला लवकरच यश मिळते, अस त्यांनी सांगितले.
(सूचना: या बातमीत दिलेली सर्व माहिती आणि तथ्ये गृहितकांवर आधारित आहेत. NEWS18 LOCAL याबाबत कोणत्याही तथ्याची पुष्टी करत नाही.)