आरतीच्या वेळा
दिवसातून पाच वेळा रामलल्लाची आरती केली जाईल. पण, भक्तांना श्रीरामाच्या फक्त तीन आरतींच्या वेळीच हजेरी लावता येईल. पहिली शृंगार आरती सकाळी साडेसहा वाजता होईल. यानंतर दुसरी आरती दुपारी 12 वाजता आणि तिसरी आरती संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी होईल. अयोध्यात रामलल्लाच्या दर्शनाची वेळ सकाळी 6 ते 11.30 अशी असेल. त्यानंतर काही काळ भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पुन्हा दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाईल.
advertisement
दर्शन तिकीट ऑनलाइन बुकिंग
- सर्वांत अगोदर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्रच्या https://online.srjbtkshetra.org या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावं लागेल.
- मोबाईलवर आलेला ओटीपी भरल्यानंतर एक पेज ओपन होईल.
- त्या पेजवरील ‘दर्शन’ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आणखी एक पेज ओपन होईल.
- तिथे दर्शनाची तारीख, वेळ, भाविकांची संख्या, देश, राज्य, मोबाईल क्रमांकासह तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागेल.
- अशा प्रकारे दर्शनासाठी बुकिंग पूर्ण होईल.
- आरतीसाठीदेखील अशाच प्रकारे बुकिंग करता येईल.
दर्शन तिकीट ऑफलाइन बुकिंग
- जर तुम्हाला रामलल्लाच्या दर्शनासाठी ऑफलाइन तिकीट पाहिजे असेल तर मंदिराजवळील काउंटरवर मिळेल. त्यासाठी तुम्हाला सरकारकडून प्रमाणित केलेलं ओळखपत्र दाखवावं लागेल.
राम मंदिराच्या अधिकृत वेबसाइटवर दर्शनासबंधी काही नियमही नमूद करण्यात आले. या नियमांचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
- 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचं स्वतंत्र तिकीट काढावं लागणार नाही.
- प्रत्यक्ष दर्शनासाठी जाताना तिकीट आणि आयडी सोबत ठेवणं गरजेचं आहे.
- एका तिकीटाच्या मदतीने एकच व्यक्ती मंदिरात जाऊ शकते.
- जर एखाद्या भक्ताने तिकीट रद्द केलं तर तो स्लॉट दुसऱ्या भक्ताला उपलब्ध करून दिला जाईल.
- दर्शनाच्या 24 तासांपूर्वी अधिकृत वेबसाइटवरून तुम्हाला मेसेज किंवा मेल येईल.
- एखाद्याला तिकीट रद्द करायचं असेल तर दर्शनाच्या 24 तासांपूर्वी रद्द करता येईल.
- स्री आणि पुरूष पारंपरिक पोशाखातच राम मंदिरात येऊ शकतात. पुरुषांना धोती-कुर्ता किंवा कुर्ता पायजमा घालावा लागेल तर स्रियांना साडी, ओढणी असलेला पंजाबी ड्रेस किंवा ओढणी असलेला चुडीदार सूट घालता येईल.