TRENDING:

Why Do We Get Shock in Winter : थंडीत कोणत्याही गोष्टीला शॉक का लागतो? नक्की हे का आणि कशामुळे होतं?

Last Updated:

What is static electricity : आपण विचार करतो, "अरे, इथे तर कोणतीही वायर नाही, मग करंट कुठून आला?" हा शॉक विजेच्या बोर्डमधून येत नाही, तर तो आपल्या शरीरातूनच येतो. यालाच वैज्ञानिक भाषेत 'स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी' म्हणतात. जो थंडीमध्ये जास्त ऍक्टिव असतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की, काही गोष्टी खूपच विचित्र घडू लागतात. कधी ऑफिसच्या खुर्चीला हात लावला की हलका शॉक बसतो, तर कधी टक असा आवाज येतो. तर कधी गाडीचं दार उघडताना बोटांना झिणझिण्या आल्यासारखं वाटतं. इतकंच काय, कधीकधी तर एखाद्याशी हात मिळवताना देखील असा लहानसा शॉक बसतो. लोकरीचं स्वेटर किंवा पॉलिस्टरच्या कपड्यांना हात लावलं तरी देखील कधीकधी 'तडतड' असा आवाज येतो आणि चक्क शॉक बसल्यासारखं होतं.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

अशा वेळी आपण विचार करतो, "अरे, इथे तर कोणतीही वायर नाही, मग करंट कुठून आला?" हा शॉक विजेच्या बोर्डमधून येत नाही, तर तो आपल्या शरीरातूनच येतो. यालाच वैज्ञानिक भाषेत 'स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी' म्हणतात. जो थंडीमध्ये जास्त ऍक्टिव असतो.

हा अनुभव तुमच्यासोबतही घडत असेल, तर त्यामागचं रंजक विज्ञान आणि तो टाळण्याचे सोपे उपाय आज आपण जाणून घेऊया.

advertisement

नेमकं काय आहे हे 'स्टॅटिक करंट'चं विज्ञान?

आपल्या आसपासची प्रत्येक वस्तू ही अणूंनी (Atoms) बनलेली असते. या अणूंमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि न्यूट्रल चार्जेस असतात. साधारणपणे हे चार्जेस संतुलित असतात. पण जेव्हा दोन वस्तू एकमेकांवर घासल्या जातात, तेव्हा त्यांच्यातील इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. यामुळे एका वस्तूवर जास्त निगेटिव्ह चार्ज जमा होतो.

जेव्हा तुमच्या शरीरात असा चार्ज जास्त प्रमाणात साचतो आणि तुम्ही अचानक एखाद्या लोखंडी वस्तूला किंवा दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श करता, तेव्हा तो चार्ज वेगाने बाहेर पडतो. याच वेगाने बाहेर पडणाऱ्या प्रक्रियेला आपण 'स्टॅटिक शॉक' म्हणतो.

advertisement

हा शॉक फक्त थंडीतच का लागतो?

उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात आपल्याला हा अनुभव येत नाही, पण हिवाळ्यातच का? याची दोन मुख्य कारणं आहेत:

1. कोरडी हवा: हिवाळ्यात हवेतील ओलावा (Humidity) खूप कमी असतो. पाणी किंवा ओलावा हा विजेचा वाहक असतो. उन्हाळ्यात हवेतील ओलावा आपल्या शरीरातील अतिरिक्त चार्ज हळूहळू हवेत सोडून देतो. पण थंडीत हवा कोरडी असल्याने हा चार्ज शरीरातच साचून राहतो आणि संधी मिळताच 'शॉक'च्या रूपात बाहेर पडतो.

advertisement

2. कपड्यांचे घर्षण थंडीत आपण लोकरीचे स्वेटर, जॅकेट किंवा सिंथेटिक कपडे घालतो. या कपड्यांचे आपल्या शरीराशी सतत घर्षण होते, ज्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणावर स्टॅटिक चार्ज तयार होतो.

हा शॉक टाळण्यासाठी काय करायचे?

हा करंट जरी धोकादायक नसला, तरी तो बसल्यावर चिडचिड होते आणि दचकायला होतं. तो टाळण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

advertisement

त्वचा हायड्रेट ठेवा

कोरड्या त्वचेवर चार्ज लवकर जमा होतो. त्यामुळे थंडीत भरपूर मॉइश्चरायझर किंवा लोशन लावा. त्वचा ओलसर असेल तर शॉक बसण्याचं प्रमाण कमी होतं.

सुती कपड्यांचा वापर

शक्य असल्यास सिंथेटिक किंवा नायलॉनऐवजी सुती (Cotton) कपड्यांना प्राधान्य द्या. सुती कपड्यांमुळे घर्षण कमी होतं.

ह्युमिडिफायर वापरा

जर घरात किंवा ऑफिसमध्ये वारंवार शॉक बसत असेल, तर तिथे ह्युमिडिफायर वापरून हवेतील ओलावा वाढवता येतो.

धातूच्या वस्तूला स्पर्श करण्याची ट्रिक

एखाद्या लोखंडी दरवाजाला किंवा कपाटाला स्पर्श करण्यापूर्वी आपल्या हातातील चावीने किंवा एखाद्या नाण्याने त्या वस्तूला स्पर्श करा. यामुळे चार्ज आधीच बाहेर निघून जाईल आणि तुमच्या बोटांना झटका बसणार नाही.

जर तुम्हाला खूप जास्त शॉक बसत असतील, तर वारंवार हात धुवा किंवा पाण्याला स्पर्श करा, यामुळे चार्ज डिस्चार्ज होतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी, मका आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

स्टॅटिक करंट ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीरात साचलेली ऊर्जा जेव्हा बाहेर पडण्याचा रस्ता शोधते, तेव्हा आपल्याला तो चटका बसतो. त्यामुळे पुढच्या वेळी स्वेटर काढताना 'तडतड' आवाज आला किंवा दरवाजाच्या हँडलने 'झटका' दिला, तर घाबरून जाऊ नका; समजून घ्या की ही निसर्गाची एक छोटीशी वीज आहे.

मराठी बातम्या/science/
Why Do We Get Shock in Winter : थंडीत कोणत्याही गोष्टीला शॉक का लागतो? नक्की हे का आणि कशामुळे होतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल