TRENDING:

क्रिकेट खेळता खेळता जमिनीवर कोसळला, काही क्षणात 22 वर्षांच्या खेळाडूचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Last Updated:

क्रिकेट खेळता खेळता एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. क्रिकेट खेळताना तो अचानक मैदानात कोसळला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Cricket Player Death : आयपीएल 2026 चा हंगाम सूरू व्हायला आता आठवडा भराचा कालावधी उरला आहे. असे असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळता खेळता एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. क्रिकेट खेळताना तो अचानक मैदानात कोसळला, त्यानंतर त्याला हार्ट अटॅक आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने क्रिकेटपटूंच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
cricket story
cricket story
advertisement

खरं तर क्रिकेट खेळता खेळता हार्ट अटॅक येऊन क्रिकेटपटूंच्या मृत्यूच्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत देखील 22 वर्षीय खेळाडू हा मैदानात क्रिकेट खेळत होता. भरं उन्हात क्रिकेट खेळत असताना तो मैदानात कोसळला. या दरम्यान त्याचा हार्टअटॅक येऊन मृत्यू झाला होता. शाकिब असे या 22 वर्षीय खेळाडूचं नाव होतं. ही घटना उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील हरहरपुर मटकली गावात घडली आहे.

advertisement

शाकिब हा दिल्लीत राहून बीएससीचा अभ्यास करायचा. पण रमजान ईद सणासाठी तो सात दिवसआधीच तो आपल्या घरी आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 12 वाजता शाकीब आपल्या मित्रांसोबत गावात क्रिकेट खेळत होता. यावेळी क्रिकेट खेळता खेळता तो अचानक जमिनीवर कोसळला होता. या दरम्यान त्याला दम लागला होता.त्यानंतर शाकीबची अशी अवस्था पाहून त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीत काय आहे? नववी नापास पुणेकरानं सुरू केला बिझनेस, 16 हजार गुंतवणूक अन् लाखोंची उलाढाल, Video
सर्व पहा

दरम्यान या घटनेने शाकिबच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
क्रिकेट खेळता खेळता जमिनीवर कोसळला, काही क्षणात 22 वर्षांच्या खेळाडूचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल