गुजरात टायटन्सच्या खेळाडूला कुणापासून धोका?
गुजरात टायटन्सच्या या खेळाडूने स्वत:च्या सुरक्षेसाठी बुलटप्रुफ कार घेतली आहे. मी त्याशिवाय प्रवास करू शकत नाही, असं म्हणत त्याने कारण देखील सांगितलं. त्यामुळे त्याला कुणापासून धोका आहे? असा सवाल विचारला जातोय. गुजरात टायटन्सचा हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून राशीद खान आहे. राशीद खान याने बुलेटप्रूफ कार खरेदी केलीये. केविन पीटरसनसोबत बोलताना राशीदने मोठा खुलासा केला. राशीद खानकडे सलमान खानपेक्षा भारी बुलेटप्रूफ कार आहे.
advertisement
मी बुटेलप्रुफ गाडीशिवाय बाहेर...
अफगाणिस्तानात तुझं जीवन कसं आहे? तुसा रस्त्यावर चालणं सोयीचं वाटतं का? असा प्रश्न राशीद खान याला केपीने विचारला. प्रश्नच उद्भवत नाही. मी बुटेलप्रुफ गाडीशिवाय बाहेरच निघू शकत नाही, असं राशीद म्हणतो. काबूलमध्ये तुझ्याकडे बुलेटप्रूफ गाडी आहे का? असा सवाल केल्यावर, हो नक्कीच. मी माझ्या बुलेटप्रूफ गाडीने प्रवास करतो. मला त्याशिवाय सुरक्षितच नाही, असं राशिद खान म्हणतो.
लोक कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात
जरी कोणीही मला कुणी गोळी मारली नाही तरी. परिस्थिती अशी आहे की तुम्ही कधीही, कुठेही चुकीच्या ठिकाणी असू शकता आणि तुम्हाला ते कळणारही नाही, असंही राशीद म्हणतो. बुलेटप्रूफ कार अफगाणिस्तानात सामान्य आहे. कधीकधी लोक कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत, तुम्ही बुलेटप्रूफ कारमध्ये सुरक्षित आहात. बुलेटप्रूफ कार तिथे सामान्य आहेत, असंही राशीद खान म्हणतो.
