बोरामणी येथील दगडी चक्रव्यूह निसर्गप्रेमींमुळे समोर आला आहे. एका वन्यजीव निरीक्षण मोहिमेदरम्यान नेचर कंजर्वेशन सर्कल ही संस्था बोरामणी येथील वन क्षेत्रामध्ये माळढोक (सोनचीरैया) आणि लांडग्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती. तेव्हा नेचर कंजर्वेशन सर्कल टीममधील पप्पू जमादार, भरत छेडा, नितीन अनवेकर आणि अन्य सदस्यांना दगडांपासून एक विशिष्ट रचना दिसून आली. तेव्हा याची माहिती पुरातत्त्व शास्त्रज्ञ सचिन पाटील यांना देण्यात आली. सचिन पाटील यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि 2 हजार वर्ष जुन्या दगडी चक्रव्यूह रचनेचा शोध लागला.
advertisement
Unique machine : 16 वर्षांच्या दिनेशची कमाल, शेतीच्या कामासाठी बनवले अनोखे मशीन, 7 कामे होणार, Video
पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी या चक्रव्यूहचा सखोल अभ्यास केला असून धक्कादायक निष्कर्ष मांडले आहेत. भारतामध्ये कमी घेरे असलेले चक्रव्यूह आढळतात. पण 15 घेरे असलेला एवढा मोठा विशाल रचना असलेला चक्रव्यूह पहिल्यांदाच सापडला आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार याची रचना इसवी सन पहिल्या ते तिसऱ्या शतकाच्या दरम्यानची म्हणजेच सुमारे 2 हजार वर्षे जुनी आहे.
हा चक्रव्यूह लहान दगडांच्या तुकड्यांपासून बनवलेला असून तो जमिनीपासून एक ते दीड इंच उंच मातीच्या थरावर बनवला आहे. या चक्रव्यूहची रचना त्या काळातील रोमन ग्रेट नाण्यावर आढळणाऱ्या चिन्हाशी तंतोतंत जुळते. त्या काळात सोलापूर हे जागतिक व्यापाराचे एक मुख्य केंद्र होते आणिरोमन व्यापारी या खुणेचा वापर नेवीगेशनल मार्कर म्हणजेच मार्ग ओळखण्यासाठी करत असावे.
दक्षिण सोलापुरातील बोरामणीचा हा भाग त्याच ऐतिहासिक व्यापारी मार्गाचा महत्त्वाचा भाग असावा. सोलापूरच्या बोरामणी माळरानावर सापडलेला हा चक्रव्यूह प्राचीन इंजीनिअरिंग आणि भूगोलाच्या दृष्टिकोनाने एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.





